Friday, April 26, 2024
Homeनाशिक‘करोना’नंतर कंम्प्युटर्सची मागणी वाढणार; विक्रेत्यांचा अंदाज

‘करोना’नंतर कंम्प्युटर्सची मागणी वाढणार; विक्रेत्यांचा अंदाज

नाशिक | नील कुलकर्णी : कोविड- १९ विषाणू साथीच्या संक्रमणाने जगात उद्योग व्यवसायाची सर्व समीकरणे मोडीत काढली. त्यानंतर देशातील मोबाईल-संगणक, एक्सेसरीज विक्रीमध्येही याचे मोठे परिणाम दिसले. करोना परिस्थितीनंतर स्वस्त मोबाईलला मागणी वाढली तर झुम-स्काईप ‘ईस्टॉल’ करुनच मग लॅपटॉपला ग्राहक पसंती देत आहे.

मोबाईल-संगणक, गॅझेटस् विश्‍वाला या जागतिक माहामारीचा फटका बसला तरी विस्कटेली ही घडी लवकरच सुरळीत होईल, असा विश्‍वास विक्रेत्यांनी व्यक्त केला. घरून काम आणि डिजीटल शिक्षण यामुळे संगणक-लॅपटॉप विक्रीत वाढ होणार आहे.

- Advertisement -

‘करोना’ संकटानंतर देशभर लागलेल्या दीड महिन्यांच्या लॉकडाऊन नंतर शहरातील मोबाईल-संगणक विक्रीची दालने नुकतिच नियोजित वेळेत सुरू झाली.

करोनामुळे आर्थिक घडी विस्कटेल्या ग्राहकांनी सध्याला महागडे उंची मोबाईल्सकडे पाठ फिरवली असली तरी मध्यम किंमतीच्या मोबाईला दुकाने उघडताच मोठी मागणी आली, अशी माहिती अनेक दुकानदारांनी दिली. मात्र ८ ते १२ हजार रुपये किंमतीचे मोबाईल्स लॉकडाऊनमुळे उपलब्ध झाले नसल्याने रिअल मी, एमआई सह इतर ब्रॅण्डेड कंपन्यांचा मोबाईलचा पुुरेसा साठा दालनात पोहचलेला नाही. मात्र लॉक डाऊन उठल्यानंतर येत्या महिनाभरात स्थिती सुरळित होईल असा आशावाद विक्रेत्यांनी बोलून दाखवला.

करोना संसर्गाच्या भितीने ग्राहक संगणक, लॅपटॉप खरेदीसाठी बाजारपेठेत उतरला नाही. मात्र तरीही२० ते ३० हजारांचा लॅपटॉप खरेदीची विक्री होत आहे, असे दुकानदारांनी सांगितले. येत्या ७ दिवसात संगणक, लॅपटॉपसाठी ग्राहकांना कर्ज देणार्‍या वित्तीय संस्थाच्या सेवा सुरू होतील, तेव्हा ग्राहकी वाढेल, अशी माहिती संगणक विक्रेत्यांनी दिली.

एकूणच कोव्हीड-१९ नंतर मोबाईल आणि संगणक बाजारात विलक्षण आर्थिक स्थित्यंतरे झाली. मात्र ही परिस्थिती लवकरच पूर्ववत होऊन संगणक मोबाईल बाजाराला पूर्वीचे समृद्ध दिवस येतील असा आशावाद सर्वच विक्रेत्यांनी बोलून दाखवला.

संगणक मागणीत वाढ
‘करोना’ प्रभावामुळे निर्माण झालेले आव्हान पेलून संगणक विक्री सुरळित होण्यास काही काळ लागेल. मात्र साथीच्या रोगामुळे सर्वत्र ‘वर्क फ्रॉफ होम’ ऑनलाईन व्हर्च्यूअल शिक्षण या संकल्पना जोम धरत आहेत. साहजिकच संगणक,लॅपटॉप, गॅझेटच्या विक्रीत मोठी वाढ होण्याची आशा आहे. मार्केटमध्ये सध्या टेलिफोनिक माहिती घेऊन ग्राहक‘ संगणकाची डिलेव्हरी’ करत आहे. मात्र टाळेबंदी उठल्यानंतर ग्राहकी वाढ होईल.
संजय चावला, सॅन कम्प्युटर.

स्काईप-झूमसह लॅपटॉप
‘करोना’ ताळेबंदीनंतर बाजारात लॅपटॉप, संगणकांच्या किंमतीत ५ ते १० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र आमच्या दालनातून आम्ही पूर्वीच्या किंमतीत लॅपटॉप, संगणक, मोबाईल विक्री करत आहोत. करोनानंतरची स्थिती लवकरच सुधारेल. आताही ग्राहक ‘स्काईप-झूम’इनस्टॉलेशन करून द्या असे सांगत २० ते ३० हजार किंमतीचे लॅपटाप खरेदी करत आहेत.
– मयूर पारख, संगणक, मोबाईल विक्रेते

मध्यम किंमतीचे मोबाईल
‘करोना’ टाळेबंदीनंतर बाजार उघडल्यानंतर ग्राहकांची गर्दी वाढत आहे. मध्यम किंमतीच्या मोबाईलला मागणी प्रचंड आहे मात्र टाळेबंदीनंतर वाहतुक बंद असल्याने माल पोहचला नाही. परंतु हे चित्र लवकरच पालटेल १७ मे नंतर मोबाईलचा पुरवठा होर्इॅल आणि साठा पूर्ववत झाला की मोबाईल बाजार ग्राहकांनी फूलून जाईल याची आम्हाला आशा आहे. दरम्यान वेट ऍण्ड वॉचची भूमिका घेत संपूर्ण सुरक्षेनिशी आम्ही बाजारात नव्या जोमाने पाऊल ठेवले आहे.
– मयूर जाधव, मोबाईल विक्रेता

खासगी ग्राहक वाढणार
करोना संकटानंतर उद्भवलेल्या परिस्थितीतून संगणक विश्‍व अत्यंत कमी काळात पूर्ववत होईल. सुदैवाने आपल्या देशात संगणकाला पुरेशी मागणी असल्याने विदेशी बाजारपेठेतील ग्राहक शोध घेण्याची गरज नाही. मात्र यानंतर कॉर्पोरेट जगत, सरकारी आस्थापना याच्याकडून संगणकाची मागणी कमी होईल मात्र ‘पोस्ट करोना’पर्वात ‘घरून काम’ ऑनलाईन शिक्षण संस्कृतीला जन्म घातल्याने घराघरातून लॅपटॉप, डेस्कटॉपमधील मागणी वाढणार आहे. पर्यायाने संगणकची विक्री उलाढाल राहील्याने बाजार संतुलीत होईल.
– नितिन गीते, संगणक विक्रेते

- Advertisment -

ताज्या बातम्या