नाशिक-दिल्ली विमानसेवा सुरु होणार?
Share

नाशिक । प्रतिनिधी
नाशिक-दिल्ली या मार्गावरील हवाई सेवा सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गोएअर वेज कंपनीने खा.हेमंत गोडसे यांना पत्र देऊन या मार्गावर विमानसेवा चालविण्यास सहमती दर्शवली आहे. जेट एअरवेज कंपनी दिवाळखोरीत निघाल्याने नाशिक – दिल्ली ही विमानसेवा मागील काही दिवसापासून बंद पडली होती.
गोएयर वेज कंपनीच्या सहमतीमुळे लवकरच नाशिक-दिल्ली विमानसेवा सुरळीतपणे सुरू होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.. ही विमानसेवा सुरू व्हावी यासाठी मागील काही दिवसांपासून ते प्रयत्न करत होते. जेट एअरवेज कंपनीकडून ही सेवा सुरळित सुरु होती. मात्र, कंपनीच डबघाईला आल्याने ही सेवा मागील काही दिवसांपासून बंद होती.
ही सेवा सुरु रहावी यासाठी खा.गोडसे यांनी यांनी उडडाण मंत्रालयाबरोबरच विविध कंपन्याशी पत्र व्यवहार केला होता. या प्रयत्नाना यश मिळण्याची चिन्हे आहेत. गोएयर वेज कंपनी विमानसेवा सुरू करण्याच्या परवानगीसाठी उड्डाण मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविणार आहे.