Friday, April 26, 2024
Homeनाशिकदोन गुणांनी अपयश मिळालं पण पीएसआय परीक्षेत एससी प्रवर्गातून राज्यात पहिला

दोन गुणांनी अपयश मिळालं पण पीएसआय परीक्षेत एससी प्रवर्गातून राज्यात पहिला

नाशिक : जिंदगी कि असली उदान बाकी है, जिंदगी के कई इम्तिहान अभि बाकी है, अभि तो नापी है मुठ्ठीभर जमीन, थामने अभि तो पुरा आसमान बाकी है.. असे म्हणतं मनाशी बाळगलेली जिद्द, परस्थीतीशी दोन हात करण्याची ताकद आणि प्रयत्नांची पराकाष्ठा केली सगळं साध्य होत. वडिलांचे मार्गदर्शन आणि स्वतःप्रती असलेला विश्वास सार्थ करीत अधिकारी झालेल्या अभिजित अहिरे याने राज्यात अनुसूचित जाती प्रवर्गातुन पहिला येण्याचा मान मिळवला.

मूळचा चांदवडचा असलेला अभिजीतला अभ्यासाचे बाळकडू घरातूनच मिळाले. अभिजीतचे वडील मुख्याध्यापक होते. त्यामुळे अभिजीतला सुरवातीपासूनच अभ्यासाची आवड होती. अभिजीतचे मुळगाव हे मालेगाव तालुक्यातील सौंदाणे येथील आहे. अभिजितने प्राथमिक व तंत्रनिकेतन पर्यंतचे शिक्षण चांदवड येथील झाले. वडील शिक्षक असल्याने त्यांच्या मार्गदर्शनाने अनेक विद्यार्थी उच्च पदावर गेल्याचे पाहून अभिजीतच्या मनात जिद्द निर्माण झाली. दररोज चांदवड सार्वजनिक वाचनालयातील अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली.

- Advertisement -

अभिजीतने सुरवातीला लोकसेवा आयोगाच्या आरटीओ विभागातील वाहन निरीक्षक पदाची परीक्षा दिली. या परीक्षेत दोन मार्कानी अपयश मिळाले. अभिजीतने निराश न होता पुन्हा नव्याने सुरवात केली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले. एवढेच नव्हे तर राज्यात अनुसूचित जाती प्रवर्गातुन पहिला येण्याचा मान मिळवला. खरे तर अभिजीतने राज्यातून पहिल्या येण्याचा मान मिळवत कुटुंबियांना आनंद दिला आहे.

महत्वाची बाब म्हणजे अभ्यासाच्या काळात अभिजीतने स्मार्टफोन पूर्णतः बाजूला ठेऊन उद्दिष्ट सध्या करण्यावर भर दिला. दिवसाला सरासरी सात तास अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नांत पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली.

- Advertisment -

ताज्या बातम्या