Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

अवजड वाहनांच्या वाहतुकीबाबतचा निर्णय अन्यायकारक : नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन

Share
अवजड वाहनांच्या वाहतुकीबाबतचा निर्णय अन्यायकारक : नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन Latest News Nashik Decision on Transport of Heavy Vehicles Unjustified Said Transport Union

नाशिक : अवजड वाहतुकीसंदर्भात नाशिक पोलिसांकडून घेण्यात आलेला निर्णयाबाबत पुनर्विचार करण्यात यावा तसेच याबाबत समन्वयातून योग्य तो मार्ग काढण्यात यावा अशी मागणी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे केली आहे. याबाबत नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड, उपाध्यक्ष सुभाष जांगडा, सेक्रेटरी शंकर धनावडे यांनी याबाबत निवेदन दिले आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक शहरातील वाहतुकीबाबत नाशिक पोलीस आयुक्तालायकडून नव्याने अधिसूचना काढण्यात आली असून दि.३ फेब्रुवारी २०२० रोजी लागू करण्यात येत आहे. त्यानुसार शहरातील विविध भागात अवजड वाहतुकीस मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला असून अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग सुचविण्यात आले आहे. त्याचबरोबर मालवाहतूकीबाबतही काही बदल सुचविण्यात आले आहे. अवजड वाहनांच्या वाहतुकीबाबत घेतलेला हा निर्णय वाहतूक दारांसाठी अन्यायकारक असून या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची नितांत आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.

त्यांनी पुढे म्हटले आहे की, वाहतुकीबाबत नाशिक पोलीस आयुक्तालायकडून घेण्यात आलेल्या निर्णयात दर्शविलेले रस्त्यांची परिस्थिती मुळात व्यवस्थित नाही. यामध्ये सुचविण्यात आलेले रस्ते अवजड वाहणाकरीता अगदी छोटे आहे व लांब वाहणाना वळणावर पुरेशी जागा नाही तसेच आगोदरच या रस्त्यांवर छोट्या वाहनाची वाहतूक जास्त असून यात हेवी वाहतूक कंटेनर,वाहन वाहतूक लांब वाहन, ज्वलनशील गॅस वाहतूक लांब वाहन, ट्रेलर वाढल्यावर अपघात वाढन्याची शक्यता आहे.

त्याचबरोबर दुसऱ्या निर्णयामुळे शहरात लागणारा माल त्यात किराणा, ऑटो माबाईलसह इतर वस्तू असतील तर त्या रात्री १० नंतर खाली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे रात्री १० नंतर कामगार व्यवस्था करणे अत्यंत अवघड आहे. त्याचबरोबर रात्री रहदारीच्या ठिकाणी अवजड वाहनांतील माल खाली करतेवेळी रहिवाशांना अनेक त्रास सहन करावा लागणार असून हा निर्णय नागरिक आणि वाहतूकदार यांच्या हिताचा नसून या निर्णयाचा पुनर्विचार करण्यात यावा किंवा पर्यायी व्यवस्था निर्णय होईपर्यंत काही काळ हा विचार लांबणीवर टाकावा अशी मागणी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!