Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

अवकाळी अनुदान वाटपासाठी ३१ डिसेंबरची डेडलाईन

Share
अवकाळी अनुदान वाटपासाठी ३१ डिसेंबरची डेडलाईन latest-news-nashik-deadline-for-untimely-grant-allocation-in-december-31

नाशिक । अवकाळी पावसाने नूकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदतीसाठी शासनाकडून जिल्हा प्रशासनाला 381 कोटींचे अनुदान प्राप्त झाले होते. हा निधी प्राप्त होऊन दोन आठवडे लोटले तरी ही मदत अद्याप लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाल्या नाही. यादयांचा घोळ, निधी बँकेत जमा करणे, धनादेश काढणे या वेळखाऊ प्रक्रियेमुळे दुसर्‍या टप्प्यात 50 टक्के शेतकर्‍यांनाच ही मदत प्राप्त होऊ शकली आहे. येत्या 31 डिसेंबरपर्यंत उर्वरीत शेतकर्‍यांच्या खात्यावर मदत जमा करण्याची डेडलाईन देण्यात आल्याचे समजते.

जिल्हा प्रशासनाने अवकाळीचे पंचनामे केल्यानंतर नूकसान भरपाईसाठी राज्य शासनाकडे 536 कोटींचा आराखडा पाठवला होता. त्यापैकी पहिल्या टप्प्यात जिल्ह्याला 181 कोटी 50 लाख 84 हजारांची मदत प्राप्त झाली होती. अवकाळी नूकसानग्रस्त साडेसात लाखांपैकी अडीच लाख शेतकर्‍यांच्या खात्यावर मदत जमा करण्यात आली. शासनाकडून दोन आठवडयापुर्वी दुसर्‍या टप्प्यात 396 कोटी 62 लाख 45 हजारांचे अनुदान जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहे.

मागील दोन दिवसात 15 तालुक्यांना या मदत निधीचे वाटप पूर्ण झाले आहे. डिसेंबर अखेर पर्यंत ही मदत वर्ग करण्याची मुदत देण्यात आली आहे. मात्र, बँक व जिल्हा प्रशासन यांच्यात ताळमेळ नसल्याने ही मदत नूकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्यास विलंब होत आहे. शिवाय पंचनामे करताना अनेक शेतकर्‍यांनी दिलेली बँक खाते, आधार कॉर्ड नंबर, मोबाईल नंबर ही माहीती जुळत नसल्याचे समोर येत आहे.

बँकांना अपेक्षित फॉरमॅटमध्ये माहिती नसल्याने तांत्रिक कारणे पुढे करत ते जिल्हाप्रशासनाकडे तक्रार करत आहेत. जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त याद्यांची बंँकाकडून तपासणी केली जात आहे. त्यामुळे नूकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत वाटपाला उशीर होत आहे. प्राप्त निधीपैकी जेमतेम 50 टक्के अनुदानाचे वाटप होऊ शकले आहे. मात्र, 31 डिसेंबरपर्यंत उर्वरीत शेतकर्‍यांच्या खात्यावर अनुदान जमा होईल, असा दावा जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

साडेसहा लाख हेक्टरवर नूकसान
ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात परतीच्या पावसाने जिल्ह्याला झोडपले होते. यामुळे मालेगाव, नांदगाव, निफाड, सिन्नर, बागलाण, चांदवडसह अनेक तालुक्यांत शेत पिकांचे अतोनात नूकसान झाले. द्राक्ष, डाळिंब, कांदा, मका, सोयाबीन, कापूस, ज्वारी, भाजीपाला या पिकांना पावसाचा मोठा फटका बसला. जिल्ह्यातील साडेसहा लाख हेक्टरवरील पिके उध्दवस्त झाली आहेत.
.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!