व्हॅलेंटाईन डे : प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं…

jalgaon-digital
2 Min Read

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं , तुमचं आमचं से असतं’ असं नेहमी म्हटले जात. अन हेच प्रेम साजरा करण्यासाठी १४ फेब्रुवारीला उधाण येत. आज १४ फेब्रुवारी प्रेमाचा दिवस म्हणूनही ओळखला जातो. हा दिवस सेंट व्हॅलेंटाईन यांच्या नावाने साजरा केला जातो.

व्हॅलेंटाईन डेला आठवत ते आपलं पाहिलं प्रेम. पहिलं प्रेम प्रत्येकाच्या वाटलेला येत असं नाही तर ती एक वाऱ्याची झुळूक असते जी प्रत्येकाला अनुभव देत नाही. कधी कधी प्रेम जपून ठेवावं असत असत. तर कधी जखमा देऊन जात. आपल्या सोबत कोणीतरी हक्काचं माणूस असावं जे आपल्या सुख दुःखात कायम सोबत राहील. अशा व्यक्तीच्या शोधात प्रत्येकजण असतो. काही थोडावेळ सोबत असतात तर काही आयुष्याचे साथीदार होऊन प्रेम फुलवतात. प्रत्येकाच्या सुखात फक्त एकच सूर असतो.

सध्याच्या प्रेमाच्या व्याख्या बदललेल्या असून आजच्या जगात प्रेम हे कधी ऑनलाईन तर् कधी ऑफलाईन जुळताना आपण पाहतो. काळानुरूप प्रेमाची भाषा बदलली असून व्हाट्सअँपचे स्टेटस बदलावे तसे प्रियकर आणि प्रेयसी बदलतात. सध्या प्रेमाचा प्रवास हलकेसे लाजणं, चोरून पाहणं यावरून थेट बोलणं इथपर्यंत पोहचल आहे.

आयुष्यात कधीतरी प्रेम केलं असेल मनात भरलं असेल अशी व्यक्ती ओळखणं फार सोपं असत. त्यामुले आयुष्यात प्रेमाला अढळ स्थान आहे. प्रेम करायलाच हवं. मग ते प्रेयसी, बायको, आईवडील, भाऊ बहीण, मित्र यावरही करता येत. इतकं साधं अन सरळ प्रेम असत.

सलिल परांजपे, देशदूत नाशिक

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *