Tuesday, April 23, 2024
Homeनाशिक#HappyBirthday : दादासाहेब फाळके यांचे जन्मगाव त्र्यंबकेश्वर चित्रपट सृष्टीपासून दूर

#HappyBirthday : दादासाहेब फाळके यांचे जन्मगाव त्र्यंबकेश्वर चित्रपट सृष्टीपासून दूर

त्र्यंबकेश्वर : भारतीय चित्रपट सृष्टीला नवा आयाम देणाऱ्या चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा आज जन्मदिवस.

समारे दीडशे वर्षांपूर्वी म्हणजेच ३० एप्रिल १८७० रोजी त्र्यंबकेश्वर येथे गोविंदशास्त्री आणि द्वारकाबाई फाळके यांच्या घरात धुंडिराज यांचा जन्म झाला.

- Advertisement -

भारतीय चित्रपसृष्टीचे आद्य जनक म्हणून ओळख असलेल्या दादासाहेब फाळके यांनी त्यावेळी पहिला भारतीय मुकपट तयार केला. आणि आज भारतीय चित्रपट सृष्टी वेगळ्या उंचीवर पोहचली आहे.

दादासाहेब फाळके यांचा जन्म झालेल्या त्र्यंबकेश्वर नगरी आजही जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. इथे येणारा प्रत्येक भाविक निखळ निसर्ग सौंदर्याच्या प्रेमात न पडला तर नवलंच… परंतु हेच त्र्यंबकेश्वर चित्रपट सृष्टी पासून लांब राहिल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

त्र्यंबकेश्वर केवळ मंदिरे, पूजापाठ। किंवा विदेशी पर्यटकांसाठी असल्याचे सांगितले जाते. परंतु येथील परिसर हा चित्रकरणास खूपच साजेसा आहे.

सिनेसृष्टीचे लक्ष दादा साहेब फाळके यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराकडे असते मात्र सिनेसृष्टीने कधी त्र्यंबकेश्वर कडे लक्ष दिले नाही असेच जाणवते. दादासाहेबांनी
राजाहरिश्चंद्र हा देशातील पहिला मूकपट तयार करून त्यांनी भारतीय सिनेसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली.

या चित्रपटाचे चित्रीकरण त्र्यंबकेश्वर नगरीत झाले. त्र्यंबकेश्वर नगरीतील त्या काळातील कलाकार चमकले नंतर दादासाहेबांनी ‘मोहिनी भस्मासूर, लंकादहन, श्रीकृष्णजन्म, कालिया मर्दन आदी चित्रपट काढले

दरम्यान गेल्या ८० वर्षीच्या काळात त्र्यंबकेश्वर नगरी लगतच्या परिसरात सिनेसृद्धतीने हिंदी मराठी अशा ४० ते ४५ चित्रपटाचे चित्रीकरण झालेले आहे. त्यामुळे निसर्ग सौंदर्य लाभलेल्या या त्र्यंबक नगरीला चित्रपट सृष्टीने चार चांद लावणे गरजेचे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या