सायकल चळवळ रुजण्यासाठी आता ‘सायकल रविवार’

सायकल चळवळ रुजण्यासाठी आता ‘सायकल रविवार’

नाशिक : शहरात सायकल चळवळ रूजावी आणि नागरिकांनी अधिकाधीक सायकलचा वापर करावा, तसेच पर्यावरणाचा संदेश देत नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेड आणि नाशिक सायकलिस्टस् फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यामाने आज दिनांक 12 जानेवारी, 2020 पासून रविवार “सायकल वार या उपक्रमाला सुरूवात झाली.

आज ठीक सकाळी सात वाजता भोंसला चौक येथे सुरू झालेली सायकल राईड कॉलेजरोड मार्गे जुना गंगापूर नाका सिग्नल येथून जेहान सर्कल मार्गे पुन्हा भोंसला चौकात येत पार पडली. सायकल चळवळ तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सुरू झालेल्या चळवळीतील हा पहिला उपक्रम आज पार पडला.

आता याप्रमाणे प्रत्येक रविवारी शहरातील एका ठराविक भागामध्ये सायकल राईड घेतली जाणार आहे. सदर परिसरातील नागरिकांना नाशिक स्मार्ट सिटी आणि नाशिक सायकलिस्टस् असोसिएशनच्या वतीने सदर सायकल राईडमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

सायकल आपल्याजवळ असली किंवा नसली तरीही आपण या राईडमध्ये सहभागी होऊ शकता. सहभागी होण्यासाठी आपणाला राईडच्या ठिकाणी हजर राहणे आवश्यक आहे. ज्यांच्याजवळ सायकल आहे ते सायकल घेऊन येऊ शकतात. ज्यांच्याजवळ सायकल नाही त्यांना स्मार्ट सिटी अंतर्गत असलेली सायकल राईडच्या ठिकाणी घेता येईल.

त्याचबरोर २६ जानेवारी, २०२० रोजी शहरातील ठरलेल्या रूटवर सायकलिस्ट फेरी मारून म्हणजेच “सिटी रायडिंग” च्या माध्यमातून सायकलिंगबाबत जनजागृती करणार आहेत. आणि २२ सप्टेंबर, २०२० हा दिवस वाहनरहित, म्हणजे सकाळपासून ते ऑफिसला जाईपर्यंत आणि ऑफिसहून घरी परत येईपर्यंत एक दिवस फक्त सायकलचा वापर करण्यात यावा, असे नागरिकांना आवाहन करून त्यांना सायकल वापरण्याचा आग्रह करणे तसेच सायकल वापराबाबत जनजागृती करण्याबाबतही मोहिम राबविण्यात येणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com