Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

शहरातील कमानी घडविणार ‘नाशिक दर्शन’; युवा चित्रकर्मींना रोजगार

Share
शहरातील कमानी घडविणार ‘नाशिक दर्शन’; युवा चित्रकर्मींना रोजगार Latest News Nashik Culture is Painted by the Entrance of the City Through Mahindra

नाशिक । विविध वैशिष्टांनी सजलेेल्या गोदानगरीची संस्कृती आता शहरातील कमानीवर चित्रकृतीतून दिसणार आहे. नाशिक महापालिका महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राच्या सहयोगाने हा रंगीत उपक्रम साकारत आहे. या माध्यमातून शहरातील युवा चित्रकर्मींना रोजगार उपलब्ध झाला आहे.

नाशिक शहरात प्रवेश करताना महापालिकेतर्फे त्र्यंबकरोड, गंगापूररोड, पेठ रोड, दिंडोरीरोड, औरंगाबादरोड या मार्गावर प्रवेशद्वाराच्या कमानी उभारण्यात आल्या, मात्र कुंभमेळ्यानंतर या कमानींची दुरवस्था झाली; आता मनपा ‘महिंद्रा’च्या सहयोगाने या सर्व कमानींवर नाशिक दर्शन, संस्कृती दर्शवणारी चित्रकृती रेखाटत असल्याने या कमानींचे भाग्य उजळले आहे. शहरात येणार्‍या प्रवासी आणि पर्यटकांना यावरील चित्रकृतीतून समृद्ध नाशिकची वैशिष्टे, संस्कृती समजणार आहे.

शहराची प्रवेशद्वारे असणार्‍या या सर्व कमानींवर सुरेख कलाकृती रेखाटण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, त्यामुळे नाशिकची संस्कृती पर्यटकांना माहीत होण्यासह सौंदर्यातही भर पडणार आहे. विशेष म्हणजे यातून तरुण चित्रकर्मींना रोजगार उपलब्ध झाला आहे. शहरातील 6 कलाकार तसेच त्यांना सहकार्य करणारे ज्युनियर आर्टिस्ट गेला महिनाभरापासून चित्रकृती साकारण्याचे काम करत आहेत.

60 दिवसांत हे काम पूर्ण करण्यात आले आता केवळ पेठरोडवरील कमान रंगवणे बाकी असून, येत्या दहा दिवसात हे काम पूर्ण होणार आहे. क. का. वाघ ललित कला महाविद्यालयातील तरुण चित्रकर्मींना यामध्ये रोजगार मिळाला असून, त्यांच्यामध्ये या उपक्रमामुळे चैतन्याचे वातावरण आहे.

या चित्रकारांचा कुंचला…
शहरातील प्रवेशद्वारावर नाशिकची संस्कृती आपल्या जादूई कुंचल्यातून रेखाटण्याचे काम टीमप्रमुख चित्रकाराचे श्रेयस चव्हाण (पुणे), योगेश गटकळ शिवराज तितमे, हृषीकेश भंडारे, विशाल सुतार, मयूर जाधव, संतोष पवार, कपिल गाडे, मयूर पाटील यांच्या सर्जनशील कुंचल्यातून ही चित्रे साकार होत आहेत.

या चित्रातून नाशिक दर्शन
काळाराम मंदिर, सरकारवाडा, आरोग्य विज्ञान विद्यापीठ, द्राक्षशेती, दुतोंड्या मारुती, व्हिनियार्ड, वणीची श्री सप्तशृंगी देवी, मांगीतुंगी येथील ऋषभनाथ पुतळा, प्राचीन वाडा संस्कृती, साल्हेर किल्ला, पांडवलेणी, कपिला तीर्थ, सीतागुंफा, गंगापूर धरण, सोमेश्वर मंदिर, सुला वाईन, य. च. मुक्त विद्यापीठ, बालाजी मंदिर, नवश्या गणपती, भद्रकाली माता, नाशिक ढोल, जैन मंदिर, आदिवासी तारफा नृत्य, रामशेज किल्ला, भातशेती, वारली कला, मुक्तिधाम, साधुग्राम, नांदुरमध्यमेश्वर पक्षीतीर्थ, गोदेश्वर मंदिर.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!