Saturday, April 27, 2024
Homeनाशिकबेलगाव कुऱ्हे : पिंपळगाव घाडगा येथे महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची मांदियाळी

बेलगाव कुऱ्हे : पिंपळगाव घाडगा येथे महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची मांदियाळी

इगतपुरी : तालुक्यातील पिंपळगाव घाडगा येथील प्राचीनकालीन महादेव मंदिरात महाशिवरात्रीच्या निमित्ताने भाविकांची मांदियाळी दाखल झाली होती. सकाळच्या सुमारास मंदिरात यथोचित पूजा करण्यात आली. तरुण मित्र मंडळाच्या व ग्रामस्थांच्या वतीने सर्वतीर्थ टाकेदकडे जाणाऱ्या भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले.

घोटी- शिर्डी या राज्य महामार्गापासून दोन किलोमीटर अंतरावर हे शिवमंदिर सर्वांचेच लक्ष वेधुन घेते. या मंदिरात प्राचीनकालीन शिवलिंग तर शेजारी हनुमान मंदिर देखील आहे. प्रवेशद्वाराज्वळ दगडी नंदीची मूर्ति जणू काही भक्ताना प्रेरणा देणारी आहे. या गावातील अनेक अबाल वृद्ध आजही येथील पांडवकालीन मंदिराची परंपरा टिकून ठेवतांना दिसतात.

- Advertisement -

मंदिराच्या आजुबाजुला कोरीव कामातुन शिवगण, बुद्धमूर्ति, प्रवेशद्वाराजवळ गणेश मूर्ती व इतर नक्षिकामातुन दगडी मंदिर साकारले दिसते. नाशिक येथील प्रसिद्ध पांडवलेनी प्रमाणे येथेही तसेच नक्षीकाम केलेले आहेत. पिंपळगाव घाडगा येथील पांडवानी साकारलेले शिवमंदिर त्यांच्या सुंदर कुशलतेचे प्रतिक आहे. शासनाने या शिवमंदिरासाठी सुखसुविधा उपलब्ध करुण द्याव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या