Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रसंकट गंभीर आहे, सरकार खंबीर आहे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

संकट गंभीर आहे, सरकार खंबीर आहे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : देशात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५०० पेक्षा अधिक आणि महाराष्ट्रात १०७ जणांना लागण झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असे वारंवार सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अधिक असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वेळोवेळी नागरिकांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधत आहेत.

महाराष्ट्रातील कोरोनाचे संकट गंभीर असले तरीही सरकार मात्र खंबीर असल्याचा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. तसेच नागरिकांनी कोरोना व्हायरसच्या संकटाला गांभीर्याने घेतले पाहिजे. तर सोमवारी सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद आणि संचार बंदी केली आहे. तरीही काही नागरिक नियमांचे उल्लंघन करत आहेत.

- Advertisement -

तसेच सर्वत्र लॉकडाउनची परिस्थिती पाहताजीवनावश्यक वस्तूंच्या सेवेसाठी प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र कृषीसंबंधित वाहतूकीवर परिणाम झाला आहे. तसेच काही ऑफिसातील कर्मचाऱ्यांना कामावरुन घरी जाण्यासाठी अडथळा येत असल्यास त्यांनी १०० क्रमांकावर फोन करुन पोलिसांची मदत मिळवू शकता. परंतु संबंधित कर्मचाऱ्यांकडे कंपनीचे ओळखपत्र असणे महत्वाचे असणार आहे. नागरिकांनी घरी रहा सुरक्षित रहा असे आवाहन पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

दुसऱ्या बाजूला पोलिसांनी मास्कसंबंधित टाकलेल्या धाडीच्या कामाचे कौतुक केले आहे. तर कोरोनाच्या पार्श्वभुमीवर कुठेही काळाबाजार, साठेबाजी होता कामा नये. तर राज्याच्या अन्न- धान्यसाठा आणि वितरणासंबंधित बैठक घेण्यात आली. त्यानुसार पुरेसा साठा आपल्याकडे असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच काही स्वयंसेवी संस्था, मंदिरे नागरिकांना मदत करण्यासाठी पुढे सरसवात आहेत. तर लालबागच्या राजाच्या येथे रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले होते. संकटावर मात करण्यासाठी सर्वांगातून मदत केली जात असल्याने कौतुक ही उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या