Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

करोनाच्या धास्तीने एमपीएससीच्या परीक्षेला 2100 जणांची दांडी

Share
करोनाच्या धास्तीने एमपीएससीच्या परीक्षेला 2100 जणांची दांडी Latest News Nashik Coronas Conviction Imposes 2100 People on MPSC Exam

नाशिक । करोना अर्थात कोव्हीड 19 विषाणूच्या सावटाखाली एमपीएससीची सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा (एएमव्हीआय) रविवारी (दि. 15) शहरातील 41 केंद्रांवर पार पडली. नाशिकमध्ये 15 हजार 842 उमेदवारांपैकी 13 हजार 735 उमेदवारांनी ही परीक्षा दिली. दरम्यान, कोरोनाच्या सावटाखाली झालेल्या या परीक्षेला दोन हजार 107 उमेदवारांनी दांडी मारल्याचे स्पष्ट झाले आहे.

या परीक्षेसाठी राज्यातून साधारण 95 हजार परीक्षार्थी बसले होते. पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नागपूर व अमरावती या ठिकाणच्या परीक्षा केंद्रांवर परीक्षा देण्यासाठी उमेदवारांनी गर्दी केली होती. या परीक्षेसाठी परीक्षार्थीं सकाळी दीड तास आधी प्रवेशपत्र, ओळखपत्र व त्याच्या छायांकित प्रतीसह केंद्रावर हजर होते. दरम्यान, करोनाच्या पार्श्वभूमीवर वर्गखोल्यांमध्ये परीक्षार्थींमध्ये अंतर ठेवण्यात आले होते.

गैरप्रकार नाही
प्रशासनाने 41 केंद्रांवर ही परीक्षा घेतली. त्यासाठी 1250 कर्मचारी कार्यरत करण्यात आले होते. कोणत्याही केंद्रावर कॉपी वा अन्य गैरप्रकार आढळून आला नाही. विशेष म्हणजे सर्वच परीक्षा केंद्रांवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!