Friday, April 26, 2024
Homeनाशिकमालेगावात कोरोना संशयितांचे संपूर्ण चेकअप होणार : भुजबळ

मालेगावात कोरोना संशयितांचे संपूर्ण चेकअप होणार : भुजबळ

नाशिक : नाशिकमध्ये आतापर्यंत एकही मृत्यू झालेला नव्हता, परंतु काल मालेगांव येथे कोरोनामुळे एकाचा मृत्यू झालेला आहे. सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी काळजी घेतच आहोत. जेथे जेथे रुग्ण सापडतील तेथे संपूर्ण चेकअप करण्यात येईल व परिसराची पाहणी करुन मोकाट फिरणाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल, असे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

मालेगांवात दुर्देवाने कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. चार ते पाच जण अजुन संशयित रुग्ण सापडले आहे. जीवन हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या कोरोना बाधीतांना शासकीय रुग्णालयात हलविण्यात येणार आहे. सिव्हील हॉस्पिटलमधील इतर रुग्णांची सोय केली जाणार आहे.

- Advertisement -

जिल्हाधिकारी सूरज मांढरे व कृषी मंत्री दादाजी भुसे मालेगांव मध्ये तळ ठोकून आहेत. ४०० लोकांची पथके कामाला लावण्यात आली आहेत.

ज्या परिसरातून संशयित रुग्ण सापडले, त्या भागातील लोकांची चाचणी केली जाईल. संचार बंदिचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध कडक कारवाई केली जाईल. लोकांचा जीव वाचविण्यासाठी प्रशासनास हा कठोर निर्णय घ्यावा लागत आहे. आपण त्यास सर्वांनी साथ द्यावी असे आवाहन भुजबळ यांनी केले.

धर्मगुरुंचे आदेश पाळा
हिंदू-मुस्लिम, शीख, इसाई कोणीही असो या सर्वांना त्या त्या धर्मगुरुंनी आपआपल्या समाजाला आपल्या घरात बसुन पुजा अर्चा करा. एकत्रित येऊ नका त्यामुळे कोरोनाचा धोका वाढतो आहे. असे आवाहन केले आहे. यामुळे नागरिकांनी मंदीर, मस्जिद, भाजीबाजारात मोठया प्रमाणात एकत्र येऊ नये. संपूर्ण महाराष्ट्राच्या लोकांना आवाहन करतो की, शासन व पोलीस प्रशासनास मदत करा. आपल्या आजुबाजुस एखादा रुग्ण आढळून आला तर प्रशासनास कळवा असे आवाहन भुजबळ यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या