Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकसिव्हिलमधून फरार झालेल्या संशयित रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह : डॉ. सैंदाने

सिव्हिलमधून फरार झालेल्या संशयित रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह : डॉ. सैंदाने

नाशिक : सिव्हिल रुग्णालयातुन पळ काढणारा कोरोना संशयित रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आला असून त्यापासून कोणताही धोका नसल्याचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सैंदाने यांनी सांगितले आहे.

दरम्यान येवला येथील १९ वर्षीय युवक कोरोना संशयित म्हणून शुक्रवारी सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. कोरोना संशयित असल्याने उपचार घेत असताना त्याला चेस्ट एक्स-रे काढण्यासाठी नेत असताना तो पळून गेला आहे. त्यानंतर जिल्हा प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली होती.

- Advertisement -

त्या रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्याचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सैंदाने यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्याला डिस्चार्ज सुद्धा देण्यात येणार होता. मात्र त्याआधीच तो जिल्हा शासकीय रुग्णालयातुन फरार झाला आहे. कोरोना संशयित निगेटिव्ह रुग्णाने पळ काढल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. मात्र यानंतर आता कोरोना आयसोलेशन भागात गस्त वाढवून मिळण्याची मागणी डॉ. सैंदाने यांनी पोलीस खात्याकडे केली आहे.

जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी याबाबत जिल्हा रुग्णालयास सक्त ताकीद दिली आहे. तसेच रुग्णालयातील व्यवस्थापन प्रभावी करणेबाबत सूचना केली आहे. असे प्रकार यापुढे आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध अत्यंत गंभीर कारवाई करण्यात येईल, अशा सूचना दिल्या आहेत.

जिल्ह्याला धोका नाही 

सुदैवाने फरार झालेला तो रुग्ण निगेटिव्ह असल्याने शहर आणि जिल्ह्याला कोणताही धोका नाही. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला असला तरीही कोरोना संशयित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे सर्वांनी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करून घरीच थांबावे असे आवाहन करण्यात आले आहे. फरार झालेला रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह नसल्याने पुढील मोठा धोका तूर्तास टळला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या