Saturday, May 11, 2024
Homeनाशिकवाट दिसू देगा देवा…..नाशिकच्या कलाकारांची आर्त हाक

वाट दिसू देगा देवा…..नाशिकच्या कलाकारांची आर्त हाक

नाशिक | करोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच पातळ्यावर काटेकोर नियोजन आणि उपाययोजना केल्या जात असतानाही वाढती रुग्णसंख्या आणि साथीला विविध अप्रिय घटना घडत आहे. यातून संवेदशीलपणे देवाला प्रार्थना करण्याचा वेगळा प्रयत्न नाशिकच्या कलाकारांनी आपल्या कलेतून केला आहे. ‘वाट दिसू देगा देवा ही’ अशी आर्त प्रार्थना हे ४० कलाकार आपल्या कलेतून देवाकडे करत आहेत.

येथील युवा चित्रकर्मीविनोद सोनवणे यांची संकल्पना आणि दिग्दर्शन असलेल्या ‘वाट दिसू देगा देवा’ या चित्रफितीत नाशिकचे कलाकार देवाकडे आपल्या कलेतून आर्त प्रार्थना करताना दाखवण्यात आले आहे. मुळ गाणे संगीतकार अजय-अतुल यांचे असून त्यामध्ये कलाकारानी आपल्या कलेला विविध पद्धतीने अभिव्यक्त केले आहे.

- Advertisement -

येथील संगीतकार, गीतकार, वादक, नर्तक, कलावंतांनी घरी बसूनच याचे चित्रकरण करुन त्याच्या फिती विनोद यांच्याकडे पाठवल्या आणि त्यातून अत्यंत सकारत्मक पद्धतीने देवाकडे आर्त साद घालण्यात आली.

‘वाट दिसू देगा देवा’मध्ये अभिनेत्री संदेशा पाटील, राजा पाटेकर, बासरी वादक प्रमोद हिरे, चित्रकर्मी गजानन वाल, सुबोध कांतायन, यश उनवणे, ज्योती चव्हाण, गौरी आहेर, राहुल शृंगारकर, महेश उपासनी, सुनिल गुळवे, प्रशांत केंदळे, सचिन जोशी, प्रितम मांजरे आदिंचा समावेश आहे.

युट्यूब प्रसिद्ध होताच या गाण्याला पहिल्या काही तासातच शेकडो लाईक मिळाल्या आहेत.

मानवेतासाठी प्रार्थना
सध्या करोना प्रादुर्भावामुळे अत्यंत आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे कलाकार म्हणून काहीतरी करावे वाटले. चित्र, अभिनयातून व्यक्त होत होतो पण नाशिकच्या कलाकारांना घरी बसून सर्जनात्मक आवाहन करुन ही चित्रफित निर्माण केली. यात केवळ कलाच नाही भावस्पर्शी चित्रफीत, फोटोतून आम्ही चालू परिस्थितीवर भाष्य करुन ती पून्हा पहिल्यासारखी व्हावी म्हणून देवाकडे कलेतून साकडे घातले.
– विनोद सोनवणे, चित्रकर्मी.

- Advertisment -

ताज्या बातम्या