Friday, April 26, 2024
Homeनाशिकगिरणारेत पुढील आठ दिवस लॉकडाऊन; बेसुमार गर्दीमूळ गावकऱ्यांचा निर्णय

गिरणारेत पुढील आठ दिवस लॉकडाऊन; बेसुमार गर्दीमूळ गावकऱ्यांचा निर्णय

गिरणारे : पुढील आठ दिवसांसाठी गिरणारे गाव संपूर्ण लॉक डाऊन करण्यात आले असून गावात येणाऱ्या रस्त्यावर चौकीदार तैनात करून गावात बाहेरील लोकांना पूर्ण बंदी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून गिरणारेत होणारी बेसुमार गर्दी बघता कोरोनाचा फैलाव गावकऱ्यांनी (७ मे) निर्णय घेऊन गावातील सर्व रस्ते सील करण्यात आले आहे. यात अत्यावश्यक सेवा सोडून अन्य व्यवसाय बंद ठेवण्यात येणार आहे.

- Advertisement -

गिरणारे हे बाजारपेठेचे गाव असून परिसरातील साठ ते सत्तर खेडी या ठिकाणी येत असतात. करोना महामारीत स्थानिक ग्रामपालिकेने व गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी गावात सातत्याने जनजागृती केली. शासकीय आदेश पाळून गावाचे आरोग्य अबाधित ठेवले होते.

मात्र लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्याने गेल्या काही दिवस गिरणारेत बेसुमार गर्दी होत होती. अनेक गावात बाहेरील लोकांची गर्दी वाढली होती. त्यात मास्क न लावणे, सोशल डिस्टन्स पाळला जात नव्हता. लाऊडस्पीकरवर जागृती करूनही नियमांचे उल्लंघन होत असल्याने तसेच गावाचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी गावकऱ्यांनी गावात काही दिवस पूर्ण लॉकडाऊन पाळण्यासाठी निर्णय घेतला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

ग्रामस्थांच्या निर्णयामुळ लॉकडाऊन झाले. गाव आज दिवसभर पूर्ण सुने -सुने झाले होते. अत्यावश्यक गरजा सोडून सर्व व्यवहार नागरिकांनी स्वतः होऊन बंद ठेवून गावाच्या निर्णयाला पाठिंबा दिला.

लॉकडाऊन नियम शिथिल झाल्याने गावातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येण्याची स्थिती निर्माण झाली होती. आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने अखेर ग्रामस्थांनी एकमुखी निर्णय घेऊन गाव पूर्ण सील केले. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू आहे.
– अनिल थेटे, अध्यक्ष शंभूराजे मित्र मंडळ

- Advertisment -

ताज्या बातम्या