सहकार विभागाची मुख्यमंत्री सहायता निधीस दिली दीड कोटीची मदत : जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने

सहकार विभागाची मुख्यमंत्री सहायता निधीस दिली दीड कोटीची मदत : जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने

नाशिक : करोना संकटाचा सामना करण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती, ट्रस्टी पुढे येत आहेत. मदतीचा हा यज्ञ असाच धगधगता ठेवण्यासाठी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने दीड कोटी रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीला दिली आहे. मदतीच्या माध्यमातून या संकटाशी दोन हात करण्यासाठी सहकार विभागानेही खारीचा वाटा उचलेला असल्याचे मत, जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांनी व्यक्त केले.

मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद :

करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व स्तरावरुन प्रयत्न सुरू आहेत. या विषाणूची भीषणतेचे वाढते स्वरुप पाहून वैद्यकीय सुविधा व जीवनावश्यक बाबींच्या पूर्ततेसाठी आर्थिक मदतीचे आवाहन सहकार विभागामार्फत नाशिक जिल्ह्यातील सहकारी संस्थांनाही करण्यात आले होते.

सहकारी संस्थांनी तत्काळ प्रतिसाद देवून दीड कोटीची मदत जमा केली. तसेच काही कृषी उत्पन्न बाजार समिती, नागरी सहकारी बँक, पतसंस्था यांनी डॉक्टरांना उपचारादरम्यान लागणारी सुरक्षित साधने, गरजू लोकांना खाद्य पदार्थाचे किराणा किट हे देखील उपलब्ध करून दिले असल्याचे श्री. बलसाने यांनी सांगितले.

दोनशे सहकारी संस्थांनी दिली मदत :
नाशिक जिल्ह्याल पिंपळगांव कृषी उत्पन्न बाजार समीतीकडून २५ लाख, चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीकडून ११ लाख, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून २१ लाख, नाशिक मर्चन्ट बँकेकडून ११ लाख, नाशिक जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संघाकडून ११ लाख, नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेकडून सात लाख, दि पिंपळगांव मर्चन्ट बँककेकडून पाच लाख, महेश को ऑप बँकेकडून पाच लाख, गोदावरी अर्बन बँकेकडून तीन लाखाची मदत अशा एकूण दोनशे सहकारी संस्थानी कोरोना लढ्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये दीड कोटीची रुपयाची मदत दिली आहे.

पंतप्रधान सहायता निधीसाठी साडे चोवीस लाखांची मदत :

करोनाशी मुकाबला करण्यासाठी राज्या बरोबरच केंद्राच्या पंतप्रधान सहायतेसाठी देखील पाच सहकारी संस्थांनी साडे चोवीस लाखाची मदत केली आहे.

यात नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ११ लाख, नाशिक मर्चन्ट बँकेने अकरा लाख, लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे सहकारी पतसंस्था मर्यादित डुबेरे, सिन्नर यांनी एक लाखाची मदत केली आहे. मदत करणाऱ्या या सर्व सहकारी संस्थांचे आभार श्री. बलसाने यांनी मानले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com