Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली विधान परिषदेच्या सदस्यत्त्वाची शपथ; पुढील सहा वर्ष...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली विधान परिषदेच्या सदस्यत्त्वाची शपथ; पुढील सहा वर्ष राहणार आमदार

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीवर आज शिक्कामोर्तब झाले आहे. विधिमंडळामध्ये आज (१८ मे) उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्त्वाची शपथ घेतली आहे. आता ते पुढील ६ वर्षांसाठी आमदार राहणार आहेत.

दरम्यान उद्धव ठाकरे यांच्यासोबतच ८ नवनिर्वाचित आमदारांचादेखील विधिमंडळात शपथविधी पार पडला आहे. विधानपरिषदेचे अध्यक्ष रामराजे निंबाळकर यांनी त्यांना शपथ दिली आहे. यावेळेस उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पुत्र आणि आमदार आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते.

- Advertisement -

दरम्यान या शपथविधीनंतर शिवसेनेचे माजी खासदार अरविंद सावंत यांनी आपल्या खासदारकीच्या राजीनाम्याचं खर्‍या अर्थाने चीज झालं अशी भावना मीडियाशी बोलून दाखवली आहे.

आज विधि मंडळात उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेच्या डॉ. निलम गोर्‍हे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अमोल मिटकरी आणि शशिकांत शिंदे, कॉंग्रेस पक्षाचे राजीव राठोड तर भाजपाच्या प्रवीण दटके, रमेश कराड, रणजितसिंह मोहिते-पाटील, गोपीचंद पडाळकर यांची चार उमेदवारांचा समावेश आहे.

सहा महिन्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. आज त्यांनी आमदारकीची शपथ घेत राज्यातील राजकीय अस्थिरतेला पूर्णविराम दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या