Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

सरकारी आणि खाजगी कार्यालयांसाठी ‘हा’ महत्वाचा निर्णय; लोकल व बेस्ट चालूच राहणार

Share

मुंबई : कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी यापुढील काही दिवस सरकारी कर्मचाऱ्यांची क्षमता ही ५०% ऐवजी २५% इतकी कमी केली जाईल तर सर्व खाजगी कंपन्या बंद ठेवण्यात याव्यात असे आदेश ठाकरे यांनी दिले आहेत.

हे आदेश मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपुर सहित सर्व मुख्य शहरात लागु होतील. फेबूक लाईव्ह द्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्यातील नागरिकांशी संवाद साधला.

दरम्यान महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊन आज ही संख्या ५२ वर पोहचली आहे, याच पार्श्वभूमीवर आज त्यांनी जनतेशी संवाद साधत या घोषणा केल्या. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील उपस्थित होते. सध्या राज्यात कोरोना व्हायरस हा दुसऱ्या टप्प्यात असल्याने याचा अटकाव करण्यासाठी सरकारी व खाजगी कार्यालयात ५० टक्के कर्मचारी उपस्थित ठेवण्याचे आदेश दोन दिवसांपूर्वी देण्यात आले होते. परंतु आज नव्याने यात बदल करीत हे प्रमाण २५ टक्के असावे असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

तसेच मुंबईची लाईफ लाईन असलेल्या लोकल व बसेस बंद नसणार आहेत. उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले कि, मुंबईच्या लोकल मध्ये, बस मध्ये प्रचंड गर्दी होते, या सेवा बंद केल्यास महापालिका कर्मचारी, आपत्कालीन सेवा देणारे कर्मचारी, यांना प्रवास करण्याचा मार्ग उरणार नाही त्यामुळे या सेवा बंद करता येणार नाहीत असे स्पष्ट केले.

Leave a Comment

error: Content is protected !!