Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

Video | नाशिक : गुलाबी थंडीत निर्भया मॅरेथॉन उत्साहात; ‘आर्ची’चा धम्माल डान्स

Share
Video | नाशिक : गुलाबी थंडीत निर्भया मॅरेथॉन उत्साहात; 'आर्ची'चा धम्माल डान्स Latest News Nashik City Police Nirbhaya Marathon Completed With Cheers

नाशिक : शहर पोलिसांतर्फे आयोजित निर्भया मॅरेथॉन गुलाबी थंडीत हजारो स्पर्धकांनी उपस्थितीत उत्साहात पार पडली. गुलाबी थंडी, सेलेब्रिटींचा उत्साह, डान्स या गुलाबी वातावरणात नाशिकरांनी धावण्याचा आनंद घेतला.

शहरातील ठक्कर डोम येथे सकाळी ५: २० वाजता भारतीय क्रिकेटपटू अंजिक्य रहाणे यांनी झेंडा दाखविल्यानंतर मॅरेथॉनला प्रारंभ झाला. पहिल्यांदाच नाशिक पोलिसांतर्फे महिला दिनाच्या निमित्ताने महिला सक्षमीकरणावर आधारित निर्भया मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अभिनेत्री जान्हवी कपूर, रिंकू राजगुरू उर्फ आर्ची, अभिनेता जितेंद्र जोशी, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, नाशिकचे तत्कालीन पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यावेळी उपस्थित होते.

Video | नाशिक : निर्भया मॅरेथॉनमध्ये महिला पोलिसांसोबत 'आर्ची'चा धम्माल डान्स

Video | नाशिक : निर्भया मॅरेथॉनमध्ये महिला पोलिसांसोबत 'आर्ची'चा धम्माल डान्स

Deshdoot यांनी वर पोस्ट केले शनिवार, ७ मार्च, २०२०

यावेळी हजारो सहभागी स्पर्धकांनी निर्भया मॅरेथॉनला चार चांद लावले. यामध्ये १० किमीत महिलांमध्ये १५ ते २४ वयोगटात अश्विनी जाधव, ३५ ते ४४ वयोगटात अश्विनी देवरेतर ४५ ते ९९ वयोगटात विद्या धापोडकर तर पुरुषांच्या १० किमी १५ ते २४ वयोगटात पुरुषामध्ये किरण म्हात्रे,२५ ते ३४ वयोगटात दिनकर महाले, ३५ ते ४४ वयोगटात लिंगाणा मंचिकांती, ४५ ते ९९ वयोगटात भास्कर कांबळे तर हाल्फ मॅरेथॉनमध्ये महिलांच्या १८ ते २९ वयोगटात आरती देशमुख तर पुरुष गटात १८ ते २९ वयोगटात बबन चव्हाण, ३० ते ३९ वयोगटात विनायक ढोबळे, ४० ते ४९ वयोगटात मनजीत सिंग तर ५० ते ९९ या वयोगटात चरण सिंग याने बाजी मारली.

महिला दिनाचे औचित्य साधून निर्भय मॅरेथॉन स्पर्धेतून महिला सक्षमीकरणाचा नारा यावेळी स्पर्धकांकडून देण्यात आला. एक धाव स्वतःसाठी एक डाव महिला सुरक्षिततेसाठी’ असे या मॅरेथॉनचे घोषवाक्य होते. ३ किमीच्या अंतरापर्यंत नाशिककरांसाठी फन रन ठेवण्यात आले होते. सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसाठी हात धुण्यासाठी ठिकठिकाणी सॅनिटायझर व वॉश बेसिन उपलब्ध करण्यात आले होते. तसेच ६० मेडिकल फर्स्टएड पॉइंट्स, कार्यक्रमस्थळी आयसीयू युनिट तर शंभराहून अधिक डॉक्टर, तसेच अनेक रुग्णवाहिका तैनात होत्या. ठिकठिकाणी नागरिक रस्त्याच्या बाजूला उभेच राहून स्पर्धकांचा उत्साह वाढवित होते.

सेलिब्रिटींचा उत्साह
ठक्कर डोम येथे अभिनेत्री जान्हवी कपूर, रिंकू राजगुरू, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, जितेंद्र जोशी यांनी उपस्थिती दर्शवली. सैराट फेम रिंकू उर्फ आर्चीने यावेळी महिला पोलिसांसोबत केलेला डान्स स्पर्धकांचा उत्साह वाढविणारा होता.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!