Thursday, April 25, 2024
Homeनाशिकइगतपुरी : शहर पोलिसांकडून ७३ नागरिकांवर गुन्हे दाखल व दंडात्मक कारवाई

इगतपुरी : शहर पोलिसांकडून ७३ नागरिकांवर गुन्हे दाखल व दंडात्मक कारवाई

इगतपुरी : करोना व्हायरस या रोगाचा फैलाव दिवसेंदिवस वाढतच चाललेला दिसत आहे. शासन या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. परंतु संचारबंदी लागू असताना काही महाभाग शहरात विनाकारण फिरतांना दिसतात. दरम्यान यावेळी इगतपुरी पोलिसांनी
७३ बेजबाबदार नागरिकांवर गुन्हा दाखल करून अद्दल घडवली आहे.

राज्यात येत्या ३ मे पर्यंत संचार बंदी लागू असताना काही बेजबाबदार नागरिक विनाकारण मोटारसायकली घेऊन काही ही कारणे काढून फेरफटका मारायला सार्वजनिक ठिकाणी येतांना दिसतात. काही महाभाग तर सर्रासपणे तोंडावर मास्क बांधने हे बंधनकारक असतांना सुध्दा या नियमाचे उल्लंघन करतांना दिसतात. यात महिला व तरुणीही मागे राहिल्या नाहीत. काही रिकामटेकडे तर अत्यावश्यक सेवा भाजीपाला, दुध, रेल्वे कर्मचारी, किराणा असे फलक मोटरसायकलवर लावून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

- Advertisement -

या मुळे राज्यात सगळीकडे आशा बेजबाबदार नागरिकांना चाप घालण्यासाठी संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई व गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. याच अनुषंगाने इगतपुरी पोलीस ठाण्याच्या कर्तव्यदक्ष पोलिस कर्मचाऱ्यांनी इगतपुरी शहरात कारण नसताना बाहेर रस्त्यावर फिरणारे, विनाकारण मोटारसायकल घेऊन सार्वजनिक ठिकाणी बेजबाबदारपणे तोंडावर मास्क न लागता फिरणे आशा नागरिकांवर इगतपुरी पोलिस ठाण्यात (१८८ ) सचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी ७३ बेजबाबदार नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

यामध्ये तोंडावर मास्क न लावने ५०, मोटरसायकल चालक २१,मास्क न लावता पायी चालत जाणारे २ असे ७३ जणांनवर गुन्हा दाखल करुन ३७३०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

दरम्यान या धडक कारवाईत इगतपुरी पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी गणेश वराडे, विनोद गोसावी, सचिन देसले, वैभव वाणी, दतात्रय वाजे, होमगार्ड रितेश भडांगे अमोल मोंडे, सचिन चौरे या कर्मचाऱ्यां मार्फत कारवाई करण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या