नाशिककरांना आता घरबसल्या मिळेल एलपीजी; इथे बुक करू शकता?

नाशिककरांना आता घरबसल्या मिळेल एलपीजी; इथे बुक करू शकता?

नाशिक : देशात कोवीड-१९ च्या उद्रेकामुळे पेट्रोल, डिझेल, इंधन तेल, बिटूमेन इत्यादी पेट्रोलियम उत्पादनांची मागणी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे उड्डाणांच्या स्थगितीमुळे (एव्हिएशन टर्बाइन फ्युएल ) एटीएफ ची मागणी देखील कमी झाली आहे. हे लक्षात घेऊन इंडियन ऑइल ने क्रूड ऑइल नियतंत्र आपल्या बऱ्याच रिफायनरिजमध्ये २५% ते ३०% ठेवले आहे . मागील आठवड्यापासून फिनिश्ड उत्पादनांची मागणी वाढल्यामुळे कॉर्पोरेशनला बल्क स्टोरेज स्थानात भविष्यातील मागणीकरीता साठा करून ठेवण्यात मदत झाली आहे. यामुळे देशामध्ये लॉकडाउन संपल्यावर आणि मागणी वाढल्यावर कंपनीला सहयोग मिळेल.

एलपीजी ग्राहकांसाठी आपातकालीन सेवा क्रमांक १९०६ नेहमीप्रमाणे कार्यरत आहे. पुरेसा साठा उपलब्ध असून ग्राहकांना पॅनिक-बुकिंग ची गरज भासणार नाही.या कठीण काळात इंडियन ऑइल सगळीकडे आपातकालीन इंधन देण्याकरिता वचनबद्ध आहे. कॉर्पोरेशन बॉट्लिंग स्टोरेज इंस्टॉलेशन्स ,एलपीजी बॉटलिंग प्लान्ट, इंधन स्टेशन्स आणि एलपीजी वितरकांना राज्य सरकार/स्थानिक प्रशासनाच्या सल्ल्यानुसार भौगोलिक क्षेत्रातील आवश्यक सेवा चालू ठेवायच्या आहे.

इंधन स्टेशनांवर वैयक्तिक स्वच्छता आणि सामाजिक अंतराचे नियम पाळून कर्मचारी काम करत आहे . कॉर्पोरेशने कर्मचारी , सेवा पुरवठा करणारे, कंत्राटी कामगार, पेट्रोल पंप विक्रेता, ग्राहक सेवक, एलपीजी वितरण करणाऱ्यांच्या आरोग्य या आणि सुरक्षेवर विशेष भर देत आहे.

इथे बुक करू शकता?
तुम्हाला एलपीजी रिफील करता घराबाहेर पडण्याची गरज नाही. तुम्ही ७५८८८८८८२४ या क्रमांकावर एसएमएस / आयवीआरएस किंवा व्हाट्सअँप करू शकता तसेच इंडियन ऑइल अँप किंवा http://cx.indianoil.in किंवा (पेटीएम) वरून बुक करू शकता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com