#मेरीख्रिसमस2019 : …. तर असा साजरा करतात ‘ख्रिसमस’

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक : २५ डिसेंबर य दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिवस ख्रिसमस म्हणून जगभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ख्रिश्चन धर्मियांची श्रद्धा आहे की, नाताळ हा सण १२ दिवसांच्या ‘ख्रिसमस्टाईड’ पर्वाची सुरुवात करतो. जगभरातील ख्रिस्ती बांधव, येशू ख्रिस्त यांचे अनुयाई आणि जगभरातील विविध देशांतील नागरिक नाताळ सणात सहभागी होतात. नाताळ किंवा ख्रिसमस वेगवगेळ्या पद्धतीने साजरा केला जातो.

आज जगभरात ख्रिसमस साजरा होत आहे. विविध देशांमध्येही या सणाचे महत्व खूप आहे. विदेशात १२ दिवस हा सण साजरा केला जातो. यास ‘ख्रिसमस्टाईड’ पर्वाची सुरुवात असे म्हटले जाते. या दिवशी बागेत किंवा चर्चमध्ये एकत्र येऊन ख्रिसमस गीते म्हटली जातात, मेणबत्या लावल्या जातात. चर्चमध्ये प्रार्थना सभा भरवल्या जातात. लहान मुलांसाठी २४ डिसेंबर रोजी सांताक्लॉज घरच्या चिमणीच्या आत घुसुन झोपलेल्या मुलांच्या टांगलेल्या मोज्यात खेळणी टाकत असतो. .

तसेच ठिकठिकाणी ख्रिसमस ट्री उभारला जातो. घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी या ख्रिसमस ट्रीवर काहीतरी भेटवस्तू टांगलेली असते. २५ डिसेंबरला लोक या सर्व गोष्टी पाहतात. घरातील पाळीव प्राण्यांसाठी काही आवडत्या वस्तू असतात, मेजवानी असते. काही ठिकाणी सायंकाळी हा सण साजरा करतात.

-सलिल परांजपे, देशदूत नाशिक

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *