Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकनाशिकरोड येथे पती-पतीच्या भांडणात मुलाची हत्या

नाशिकरोड येथे पती-पतीच्या भांडणात मुलाची हत्या

नाशिकरोड । पती-पत्नीच्या भांडणात त्यांचा पाच वर्षांचा मुलगा रडू लागल्याने संतप्त पित्याने त्याच्या डोक्यात बॅट मारली. गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार घेत असताना त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार उपनगर पोलिसांत पतीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितास अटक करण्यात आली आहे.

सपना भीमराव खंडारे (२५, रा. विराजनगर, गॅलेक्सी इंग्लिश स्कूलसमोर, दसक, जेलरोड) ही महिला पती, मुलगी हर्षदा (७), मुलगा आर्यन (५) असे राहतात. सपनाने दिलेल्या तक्रारीनुसार, भीमराव हे मजुरीचे काम करतात. चारित्र्याचा संशय घेऊन त्यांनी डिसेंबर महिन्यात पत्नीला मारहाण केली. त्यामुळे ती मुलांसह हिंगोली येथे माहेरी निघून गेली होती. दरम्यान, २७ जानेवारी रोजी आधारकार्ड तयार करण्याच्या बहाण्याने भीमरावने पत्नीला मुलांसह नाशिकला येण्यास सांगितले. इकडे आल्यानंतर दोन-तीन दिवस व्यवस्थित राहिल्यानंतर ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता भीमराव कामावरून घरी आला. काही वेळानंतर मागील भांडणाची कुरापत काढून तसेच चारित्र्याच्या संशयावर त्याने पत्नीला मारहाण केली.

- Advertisement -

यावेळी मुलगा आर्यन रडत रडत आल्याने खेळण्यातील लाकडी बॅटने भीमरावने मुलाच्या डोक्यावर व गुडघ्यावर मारहाण केली. यावेळी आमच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारील नागरिक गोळा झाले. त्यानंतर जखमी अवस्थेत मुलाला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु आर्यनची तब्येत खालावल्याने पुढील उपचारासाठी त्याला मुंबईतील जे. जे. रुग्णालयात हलवले. मात्र उपचार घेत असताना दि. ५ रोजी तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

हिंगोली येथे आर्यनवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर आपण उपनगर पोलीस स्टेशन गाठून झाल्या प्रकाराची माहिती दिली व पतीविरुद्ध तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार उपनगर पोलिसांनी भीमराव खंडारे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यास अटक केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या