Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

टाकेद येथे देशी कोंबडीच्या पिल्लांचे वाटप; बेरोजगारांना स्वयंमचा आधार

Share
टाकेद येथे देशी कोंबडीच्या पिल्लांचे वाटप; बेरोजगारांना स्वयंमचा आधार Latest News Nashik chiks distrubuted at taked by panchayat samiti

घोटी : इगतपुरी पंचायत समिती पशुसंवर्धन विभागाच्या स्वयंम प्रकल्पअंतर्गत ग्रामीण भागातील बेरोजगार कुटुंबांना, तरुणांना, रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून पंचायत समिती पशुसंवर्धन विभागामार्फत स्वयंम प्रकल्प योजनेअंतर्गत कुपोषण मुक्तीसाठी टाकेद बु येथे १०७ लाभार्थ्यांना त्रिस्तरीय उपक्रम राबविण्यात आला.

यामध्ये योजनेतील निवडक १०७ लाभार्थ्यांना शुक्रवार (ता.०३) रोजी सकाळी दहा वाजता डॉ.मदन परदेशी यांच्या कुक्कुटपालन फार्मवर पहिल्या टप्प्यात सातपुडा देशी प्रजातीच्या २० पक्ष्यांचे वाटप करण्यात आले.प्रत्येक लाभार्थ्यास तीन टप्यात एकूण ४५ पक्षी देण्यात येणार असून पहिला हप्ता २०, दुसरा हप्ता १५ आणि तिसरा हप्ता १० अश्या तीन टप्यात एकूण ४५ पक्षी प्रत्येक लाभार्थ्यास वाटप करून देण्यात येणार आहे.

या कोंबडयांच्या खुरड्यासाठी लाभार्थ्यास १५०० रुपये चेक स्वरूपात दिले जातात.यामध्ये दुग्ध व्यवसाय, शेळी पालन व कुक्कुटपालन करीता शासनाकडून आदिवासी व अनुसूचित जातीसाठी ७५% टक्के अनुदान दिले जाते. स्वयंमरोजगार योजनेअंतर्गत ४५ कोंबड्यांचे वाटप करण्यात येते या कोंबड्यांची पिल्ले प्रामुख्याने चार आठवड्यांची झाल्यानंतर त्या भागातील लाभार्थ्यांना कोंबड्यांचे वाटप करण्यात येते.कावेरी,गिरीराज,वनराज,सातपुडा आदी देशी जातीच्या व प्रजातीच्या कोंबडयांच्या यामध्ये समावेश होतो.

तसेच यामध्ये सदर कुक्कुटपालन करणाऱ्या लाभार्थ्याकडून पशुसंवर्धन, स्वयंरोजगार, कुपोषण निर्मूलन असे तीन उपक्रम साध्य होणार आहेत. या देशी कोंबड्यांची अंडी अंगणवाडीतील लहान बालकांना देण्यात येणार आहे.लाभार्थ्यांना ग्रामपंचायत सर्वतीर्थ टाकेदच्या वतीने या पिल्लांचे वाटप करण्यात आले.

त्याप्रसंगी जेष्ठ ग्रामस्थ रतन नाना बांबळे,सरपंच ताराबाई बांबळे,उपसरपंच रामचंद्र परदेशी,सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे,ग्रामपंचायत सदस्य सतिष बांबळे,विक्रमराजे भांगेसाहेब, जगण घोडे,केशव बांबळे आदींसह डॉ.मदन परदेशी,पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.जयश्री तळपाडे,वरणोपाचारक डॉ.पी.एल टोचे,पवन भोईर,लहानु साबळे आदींसह ग्रामस्थ व लाभार्थी उपस्थित होते.

कुपोषण मुक्तीचा उद्देश :
ग्रामीण भागातील आदिवासी कुटुंबातील मुलांना कुपोषण मुक्त करणे,कोंबडी पालनातून स्वयंरोजगार निर्माण करणे,आदिवासी कुटुंबांना कुक्कुटपालन संगोपनाची आवड निर्माण होणे आणि त्या आवडीतून त्यांना अंडी व्यवसाय करता येईल.अंडी तयार झाल्यावर त्याच्यातून स्वयंरोजगार उपलब्ध होईल.त्या कोंबडीपासून उत्पन्न म्हणून निर्माण होणारी अंडी या अंगणवाडी किंवा मार्केटमध्ये दररोज विक्रीस घेऊन जाऊन स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करता येईल.यामुळे ग्रामीण भागातील अर्थक्रांतीला व विकासाला चालना मिळणार आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!