Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकवर्षातील पहिले चंद्रग्रहण आज; असा असणार कालावधी

वर्षातील पहिले चंद्रग्रहण आज; असा असणार कालावधी

नाशिक : नववर्षातील पहिले चंद्र ग्रहण आज (दि. १०) रोजी पाहायला मिळणार आहे, विशेष म्हणजे हे ग्रहण भारतातूनही स्पष्ट दिसू शकणार आहे. रात्री १० वाजून ३७ मिनिटांनी हे ग्रहण सुरु होणार असून या ग्रहणाचा कालावधी ४ तास असून मध्यरात्री २ वाजून ४२ मिनिटांपर्यंत ग्रहणाचा प्रभाव पाहता येईल.

दरम्यान भारताशिवाय हे ग्रहण युरोप, आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया याठिकाणहून सुद्धा दिसून येईल. पृथ्वी सूर्याची आणि चंद्र पृथ्वीची परिक्रमा करत असतो. ही प्रक्रिया घडत असताना काही वेळा पृथ्वी सूर्य आणि चंद्र यांच्या मध्ये येते. या वेळी पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि चंद्र ग्रहण लागते.

- Advertisement -

तर चंद्र पृथ्वीच्या उपछायेत येणार असल्याने यावेळी ग्रहणातला चंद्र इतर ग्रहणांच्या तुलनेत कमी लाल दिसेल. चंद्र जेव्हा पृथ्वीच्या गडद छायेतून पूर्णपणे जातो तेव्हा खग्रास चंद्रग्रहण होते. परंतु हे मात्र उपछायेतील ग्रहण असणार आहे. याला छायाकल्प ग्रहण असे म्हणतात. २६ डिसेंबरच्या कंकणाकृती ग्रहणानंतर लगेचच १५ दिवसांनी या चंद्रग्रहण अनोखे असणार आहे.

या वर्षात चार चंद्रग्रहण होणार असून त्यातील पहिले चंद्रग्रहण आज होत आहे. त्यानुसार २०२० मधील चंद्रग्रहणाचे वेळापत्रक
पहिले चंद्रग्रहण १० जानेवारी, ५-६ जून, तिसरे चंद्रग्रहण ४-५ जुलै, चौथे चंद्रग्रहण २९-३० नोव्हेंबर

२०२० मधील सूर्यग्रहणाचे वेळापत्रक
पहिले सूर्यग्रहण २१ जून, दुसरे सूर्यग्रहण १४ डिसेंबर

- Advertisment -

ताज्या बातम्या