Thursday, April 25, 2024
Homeनाशिकमनमाड : यंदाची शब-ए-बारात घरातच साजरी करा; पोलिसांचे आवाहन

मनमाड : यंदाची शब-ए-बारात घरातच साजरी करा; पोलिसांचे आवाहन

मनमाड : इस्लाम धर्मात महत्वाची मानली जाणारी शब-ए- उद्या (दि.०९) रोजी असून या निमित्त केली जाणारी सामूहिक नमाज, प्रवचन (वाज-बायन) आणि पूर्वजासाठी कब्रस्तानमध्ये जाऊन केली जाणारी दुवा यंदा केली जाणार नाही. कब्रस्तानला कुलूप लावण्यात येईल अशी ग्वाही शहरातील सर्व मस्जिदचे मौलाना, ट्रस्टी आणि मुस्लिम समाजातील नेते व तसेच मनमाड शहर पोलिसांनी केली आहे.

मनमाड पोलीस कार्यालयात आयोजित करण्यात असलेल्या बैठकीत माहिती देण्यात आली.

- Advertisement -

रमजानचा पवित्र महिना सुरू होण्या अगोदर शब-ए-बारात येते. इस्लाम धर्मात शब-ए-बारातला आगळे वेगळे महत्व असून या दिवशी सायंकाळी मगरीब व त्यानंतर रात्री इशाची नमाज अदा केल्यानंतर सर्वच मस्जिद मध्ये प्रवचन होऊन दुवा केली जाते. त्यानंतर सर्व जण कब्रस्तानमध्ये जाऊन आपल्या पूर्वजासाठी विशेष दुवा करतात.

शब-ए-बारातच्या पार्श्वभूमीवर सर्वच मस्जिद आणि कबरस्थान मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होते. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव हा गर्दीमुळे जास्त प्रमाणात होत असल्याने देशभरात लॉक डाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वच सणावर निर्बंध लावण्यात आले आहे.

या बैठकीत उद्या होणारी शब-ए-बारात घरात साजरी केली जाईल, मस्जिद मध्ये फक्त मौलाना जातील व ते अजान देतील. मात्र इतर सर्व मुस्लिम बांधव हे घरात नमाज पठण करतील, अशी ग्वाही देण्यात आली.

सरकार व पोलीस विभागाकडून देण्यात येत असलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन तर केलेच जाईल शिवाय मस्जिदच्या लाऊडस्पीकर वरून कोरोना किती घातक आहे, लॉक डाऊन सोबत घरात रहा, घरा बाहेर पडू नका यासाठी जनजागृती देखील केली जाईल असे आश्वासन देखील मौलाना, विश्वस्थ तसेच पोलिसांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या