Wednesday, April 24, 2024
HomeनाशिकPhotogallery : झाड तेच, फुलेही तीच..पण रुबाब नवा; पळस फुलला

Photogallery : झाड तेच, फुलेही तीच..पण रुबाब नवा; पळस फुलला

नाशिक : उन्हाळा सुरु झाला असला तरी थंडी अजूनही अंगात असल्यासारखी जाणवत आहे. तर शिशिर ऋतू मावळून आता वसंत बहरायला सुरवात झाली आहे. अशातच ठिकठिकाणी पळसाच्या फुले रंग उधळताना दिसत आहेत.

पळस म्हणजे पलाश वृक्ष; रानाचा अग्नी. इंग्रजीत तर त्याला ‘फ्लेम ऑफ फॉरेस्ट’असे म्हटले जाते. वसंत ऋतूत फुललेल्या पळसाचे झाड सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. शहरातील विविध भागात बहरलेला पळस अनेकांना मोहवून टाकत आहे. उन्हाळा सुरू झाला की, झाडांना पानगळ लागते आणि निष्पर्ण वृक्षांचे सांगाडे पाहवयास मिळतात. अशावेळी उन्हाळ्यातही काही झाड बहरत असतात. यातलाच एक पळस पिवळा, लाल जर्द पळस आपले लक्ष वेधून घेतो.

- Advertisement -

फोटो पहा : 

पळसाचे झाड हे मध्यम आकाराचे आणि १२ ते १५ मीटर उंचीचे असते. पळसाला काळ्या रंगाच्या कळ्या येतात आणि नंतर कळ्यांची फुले होतात. दरम्यानच्या काळात पाने झडतात. पळसाला जशी पिवळी आणि पांढरीही अन दुर्मिळ आढळणारी पांढरी फुलेही आढळतात. पण या सुंदर रंगांना गंधही नाही. परंतु पळस फुलला की, संपूर्ण जंगल लाल रंगांनी न्हाऊन निघते. पळसाच्या फुलातील मध वेचण्यासाठी असंख्य पक्षी झाडावर येतात.

पळसाच्या फुलांपासून रंग बनवण्याचा देखील बनवला जातो. तसेच ग्रामीण भागात पळसाच्या पानांचा उपयोग पत्रावळीसाठीही केला जातो.

- Advertisment -

ताज्या बातम्या