Type to search

Breaking News ब्लॉग मुख्य बातम्या

Blog : कोरोनावर एकमेव उपाय रोगप्रतिकारशक्ती वाढवा

Share
Blog : कोरोनावर एकमेव उपाय रोगप्रतिकारशक्ती वाढवा Latest News Nashik Boost Your Immune System to Fight the Corona Virus

नाशिक : सध्या गेल्या एक ते दीड महिन्यापासून करोना नावाच्या विषाणूने संपूर्ण जगाला हादरून टाकले आहे .एक प्रकारची साथच यानिमित्ताने आलेली दिसते आहे आणि यासाठीच या रोगामुळे जगामध्ये अक्षरशः हा हाहाकार उडलेला दिसतो आहे. चीनमधून इतरत्र जगात पसरलेला हा विषाणू गंभीर स्वरूप धारण करून आहे.

इटली, स्पेन, इराण यासारख्या देशात अनेक ओढावलेले आहेत. तसेच देशात व रुग्णांची संख्या वाढताना दिसते आहे. यावर अनेक ठिकाणी औषध संशोधनाचे कार्य चालू आहे. आपल्या देशात आयुर्वेदाला अनन्यसाधारण महत्व आहे. तर कोरोना विषाणूचा अटकाव कर्णयसाठी आयुर्वेदात काही उपायोजना आहेत का? याचे उत्तर नाशिक मधील आयुर्वेदिक चिकित्सक कुलकर्णी यांनी दिले आहे.

वैद्य कुलकर्णी म्हणतात कि, आयुर्वेदा ला अनेक वर्षांची परंपरा आहे. एवढ्या प्राचीन काळी निर्माण झालेले शास्त्र आजच्या काळात उत्पन्न होणाऱ्या विषाणुजन्य किंवा जिवाणूजन्य रोगांवर काही उपाय करू शकेल काय अशी शंका घेणे देखील स्वाभाविकच म्हटले पाहिजे. पण आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये या पद्धतीने विविध रोगांचे वर्णन आलेले आहे. त्यामधून मात्र आजच्या स्थितीत देखील आयुर्वेदशास्त्र अशा प्रकारच्या रोगांवर नियंत्रण ठेवण्यास तसेच प्रतिकार करण्यास देखील सक्षम असू शकते, असा निष्कर्ष मात्र काढता येण्याइतपत जागा आहे. आयुर्वेदाने विविध व्याधींचे प्रकार वर्णन केले आहेत. त्यामध्ये निज आणि आगंतुज असे दोन मुख्य प्रकार पडतात. यामध्ये निज‌ म्हणजे शरीरामध्ये हे दोषांच्या विकृतीमुळे निर्माण होणारे व्याधी आणि आगंतुज म्हणजे शरीर बाह्य घटकांमुळे शरीरामध्ये निर्माण होणारे व्याधी.

सध्याचा करोना व्हायरस किंवा विषाणू यामुळे येणारा जो ताप खोकला दम लागणे हा लक्षण समुच्चय म्हणजे आगंतुज व्याधीचा एक प्रकार म्हटला पाहिजे. याबरोबरच आयुर्वेदाने औपसर्गिक म्हणजेच संसर्गजन्य रोगांबद्दल एक विशेष वर्णन आपल्या ग्रंथांमधून केलेले आहे. कुष्ठ म्हणजे विविध प्रकारचे त्वचारोग तसेच विविध प्रकारचे ताप, शोष म्हणजेच आजच्या काळात टीबी सारखे विविध प्रकार आणि नेत्रा भीशंद म्हणजेच डोळे येणे या अशा प्रकारच्या रोग समुदायाचे वर्णन आयुर्वेदाने संसर्गजन्य म्हणून केलेले आढळते.

आता हे संसर्गजन्य रोग एकमेकांमध्ये संक्रमित कसे होतात याचीही कारणे आयुर्वेदात पाहायला मिळतात. त्यामध्ये एकमेकांच्या अवयवांचा एकमेकांना स्पर्श होणे, तसेच एकाचे कपडे दुसऱ्याने वापरणे, तसेच श्वासातून रोगांचा संसर्ग होणे, या गोष्टींचा समावेश होतो. कोरोना विषाणू हा प्रामुख्याने वायु म्हणजे हवेमध्ये पसरतो आहे. हवेमध्ये दोष निर्माण झाल्यामुळे याचे संक्रमण त्वरेने होताना दिसते आहे.यासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

वात आणि कफ या दोन दोषांमुळे शरीरामध्ये अंगदुखी, सर्दी, खोकल, घसा दुखणे आणि ताप अशी विविध लक्षणे निर्माण होतात. कोरोना व्हायरस हा एक प्रकारचा फ्लू सदृश असाच प्रकार मानला पाहिजे. सध्यातरी याला प्रतिबंध करणे हाच एकमेव उपाय ठरतो. यासाठी वात आणि कफदोष वाढू न देणे, त्यासाठी गरम पाण्याचे सेवन करणे, थंड वातावरणात न जाणे, संसर्ग झालेल्या मंडळींचा संपर्क टाळणे हे प्रतिबंधात्मक उपाय नक्कीच यामध्ये उपयोगी ठरतील.

याचबरोबर साक्ष आहार, परिसरात स्वच्छता, आपल्या हातांची स्वछता अशा प्रकारचे प्रतिबंधात्मक उपाय करता येतात. तसेच योग्य काळजी घेऊन इतरांनाही याबाबत जागृत करणे महत्वाचे आहे. महत्वाचे म्हणजे आपली प्रतिकारशक्ती उत्तम असणे आवश्यक आहे. ज्यांची प्रतिकार शक्ती अत्यंत कमी आहे, त्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. जसे वृद्ध, लहान बालके, गरोदर स्रिया या लोकांची काळजी घेणे आवश्यक आहे. तेव्हा आपली प्रतिकारशक्ती उत्तम ठेवणे हे नितांत गरजेचे आणि सध्याच्या काळाची गरज आहे.

वैद्य विजय कुलकर्णी
आयुर्वेदिक चिकित्सक नाशिक
मो:- 9822075021

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!