Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

अंजूमने हकीमी दाऊदी बोहरा ट्रस्ट वसतिगृहातील मुलांना भोजन पुरविणार : जिल्हाधिकारी

Share

नाशिक | कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेवून देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे तसेच प्रत्येक जिल्ह्याच्या सीमा देखील बंद करण्यात आलेल्या आहेत. नाशिक शहरात शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर अंजूमने हकीमी दाऊदी बोहरा ट्रस्ट यांनी पुढाकार घेवून वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना अल्पदरात भोजन उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात अंजूमने हकीमी दाऊदी बोहरा ट्रस्ट, नाशिकचे पदाधिका‌ऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमच्या ट्रस्टच्यावतीने प्रशासनाला लागणाऱ्या सहकार्यासाठी तयार असल्याबाबत सांगितले.

जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले की, संघटनेच्यावतीने आपल्या मार्फत वसतिगृहात राहणा‌ऱ्या मुलांना भोजनाचा पुरवठा करण्यात यावा. तसेच आपल्या मार्फत खाजगी डॉक्टरांना दवाखाने सुरु करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात यावेत तसेच बोहरा समाजातील नागरिकांना आवश्यक औषधांचा पुरवठा करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी चर्चा केली. अंजूमने हकीमी दाऊदी बोहरा ट्रस्ट, नाशिकचे पदाधिका‌ऱ्यांनी तात्काळ सहमती दर्शिवली.

या उपक्रमाला दाऊदी बोहरा समाजाच्या वतीने जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करु. तसेच वसितगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट भोजन देण्यात येईल. तसेच आवश्यक तो औषधांचा पुरवठा आमच्या ट्रस्ट कडून करण्यात येणार असल्याचेही यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

यावेळी दाऊदी बोहरा समाजाचे समुदाय प्रमुख मस्ताली बैसाब, डॉ. मुस्तफा टोपीवाला, अम्मार मियाजी, अलिआझर आदमजी, तैयब नूरानी उपस्थित होते.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!