Type to search

नाशिक

त्र्यंबकेश्वर : शिवजयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबीर व नेत्र तपासणी

Share
त्र्यंबकेश्वर : शिवजयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबीर व नेत्र तपासणी Latest News Nashik Blood donation camp and Eye Checkup 'by YuvaPratisthan on Shiv Jayanti Trimbakeshwar

त्र्यंबकेश्वर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त युवा प्रतिष्ठानतर्फे त्र्यंबकनगरीत भव्य असे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.

दरम्यान त्र्यंबकेश्वर येथील युवा प्रतिष्ठानने सामाजिक भान राखत शिवजयंती साजरी केली आहे. येथील माउली हॉस्पिटलच्या सहकार्याने भव्य रक्तदान व नेत्रदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. युवा प्रतिष्ठानचे हे सलग दुसरे वर्ष असून शहरातील अमृतकुंभ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ७५ बॅग रक्त जमा झाले आहे.

यासाठी युवा नेते अमोल दिनकर पाटील, मनसेचे तालुकाध्यक्ष नवनाथ कोठुळे , शिवसेनेचे रवी वारुंगसे, नगराध्यक्ष पुरूषोत्तम लोहगावकर, नगराध्यक्ष सागर उजे, डॉ.पंकज बोरसे, डॉ. रोहित शेजवळ, डॉ. सचिन काळे, ऍड. भास्कर मेढे, गोटीराम करंडे, निम्स हॉस्पिटलचे डॉ.किरण पाटील, सचिन देवरे, मोनाली कापडणीस, युवा प्रतिष्ठाणचे संदीप चव्हाण, सचिन बोडके, विशाल मींदे, कैलास मींदे, विलास बोडके, योगेश बोडके, छोटू पवार तसेच आर्मी मध्ये कार्यरत असलेले गोरख कसबे, संतोष चव्हाण, विजय तिदमे, गोटीराम ससाणे आदी सह युवा प्रतिष्ठाणचे पदाधिकारी उपस्थितीत होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!