Saturday, April 27, 2024
Homeनाशिकभाजपची बैलगाडीसह तहसील कार्यालयावर धडक; राज्यभर धरणे आंदोलन

भाजपची बैलगाडीसह तहसील कार्यालयावर धडक; राज्यभर धरणे आंदोलन

नाशिक : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आणि महिलांवरील वाढते अत्याचार या विरोधात भाजपच्या वतीने आज राज्यभर धरणे आंदोलन करण्यात आले. याचाच भाग म्हणून शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर भाजपा कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. बैलगाडीत बसून यावेळी धरणे आंदोलन करण्यात आले.

दरम्यान राज्यातील शेतकऱ्यांचा सात बारा कोरा झाला पाहिजे. महिलांना, मुलींना सुरक्षित वातावरण निर्माण व्हावे या मागणीसाठी राज्यभरात भाजपकडून धरणे आंदोलन केले जात आहे. या पार्शवभूमीवर नाशकतही आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी बैलगाडीत बसून सरकारचा निषेध केला.

- Advertisement -

तसेच सरकार स्थापन करीत असतांना शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून ७/१२ कोरा करू असे आश्वासन दिले होते. मात्र या सरकारने शेतकऱ्यांची शुध्द फसवणुक केली असुन भाजप सरकारच्या काळात सुरू असलेले प्रकल्प व योजना या सरकारने सर्वसामान्यांची फसवणुक केली आहे. राज्यात महिला अत्याचारात सातत्याने वाढ होत असून अद्यापही पीडितांना न्याय मिळत नसून सरकारने लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा, अशा वक्तव्ये भाजप पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या