मखमलाबाद : आठ जणांनी ‘ही’ थाळी संपविल्यास महिनाभर जेवण फ्री; जाणून घ्या थाळीची किंमत

मखमलाबाद : आठ जणांनी ‘ही’ थाळी संपविल्यास महिनाभर जेवण फ्री; जाणून घ्या थाळीची किंमत

नाशिक : येत्या २६ जानेवारीपासून नाशकात शिवभोजन थाळी सुरु होणार असली तरी या आधी शहरात एका दुसऱ्याच थाळीची जोरदार चर्चा सुरु आहे. नव्हे शहरातच नाहीतर राज्यात ही थाळी प्रसिद्ध झाली असून मखमलाबाद येथील हिंद केसरी हॉटेलातील ‘हिंदकेसरी थाळी’ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

नाशिक हे मिसळप्रेमींसाठी म्हणून ओळखले जाते. तसेच अनेक खव्वयांसाठी देखील प्रसिद्ध आहे. शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या मखमलाबाद येथे हिंद केसरी हॉटेल सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. कारण या हॉटेलात खास नॉन व्हेज प्रेमींसाठी एक खास थाळी तयार केली आहे. या थाळीची किंमत तब्बल पाच हजार रुपये आहे. त्यामुळे तुम्ही अव्वाक व्हाल पण याचबरोबर तुम्हाला एक ऑफरही देण्यात आली आहे. जर आठ जणांनी मिळून हि थाळी संपवलीत तर तुम्हाला पुढील महिनाभर जेवण फ्री मिळणार आहे. विशेष म्हणजे जर तुम्हा आठ लोकांना ही थाळी संपली नाहीतर ५० रुपये दंड आकाराला जाणार आहे.

दरम्यान या थाळीचा आस्वाद घेण्यासाठी नाशिकर गर्दी करत असून यापेक्षा अधिक गर्दी थाळीला बघणायसाठी आलेल्या नागरिकांची दिसून येते आहे. महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी थाळी असल्याचा दावा हॉटेल चालकांकडून करण्यात आला आहे. संपूर्ण कुटुंबाने, मित्र मंडळींनी एकाच ताटात रुचकर जेवणाचा पोटभर आनंद लुटावा हा या हिंद केसरी थाळी तयार करण्यामागील उद्देश आहे .

या थाळीत काय काय?
उकड सुप, ८ पापलेट, ८ सुरमई, २५ कोळंबी फ्राय, २० रस्सा कोळंबी, ८ चिकन लेग पिस, चिकन करी, सुके चिकन, सुके मटण, खिमा, ८ ज्वारीच्या भाकरी, ८ बाजरीच्या भाकरी, ८ तांदळाच्या भाकरी, १६ चपाती, २४ सागोती वडे, सोलकढी, झिंगा चटणी, कोळंबी रस्सा, खेकडा रस्सा आणि भात यांचा समावेश आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com