Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नाशिक पुष्पोत्सवात महाशिवरात्रीनिमित्त बेल महोत्सवाचे आयोजन

Share
नाशिक पुष्पोत्सवात महाशिवरात्रीनिमित्त बेल महोत्सवाचे आयोजन Latest News Nashik Bel Festival Organized in NMC Flower Festival on Mahashivratri

नाशिक : महानगरपालिकेच्या वतीने आयोजित पुष्पोत्सव उत्सव २०२० अंतर्गत महाशिवरात्री निमित्त बेल महोत्सवात बेलाची रोपे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आयुक्त तथा अध्यक्ष वृक्ष प्राधिकरण समिती राधाकृष्ण गमे व भारती गमे यांच्या शुभहस्ते प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित नागरिकांना बेलाची रोपे वाटप करण्यात आली. यावेळी कार्यक्रमास वृक्ष प्राधिकरण सदस्य शामकुमार साबळे यांच्यासह पदाधिकारी आदी उपस्थित होते.

तसेच नाशिक शहरातील नागरिकांनी नाशिक महानगरपालिकेच्या वतीने वाटप करण्यात आलेल्या बेलाच्या रोपांची लागवड करून शहरात जास्तीत जास्त बेलाच्या वृक्षांची संख्या वाढवून पर्यावरण विकासाला हातभार लावावा.तसेच बेलवृक्ष हा औषधी व महत्वाचा आहे.

शहरातील पूर्व विभागातील जिजामाता उद्यान, काठे गल्ली, इंदिरा नगर जॉगिंग ट्रॅक,पश्चिम विभागात राका कॉलनी उद्यान, कृषिनगर जॉगिंग ट्रॅक, नवीन नाशिक विभागात गणेश चौक बाल उद्यान, संत गाडगे महाराज उद्यान, पाटील नगर, स्वामी विवेकानंद नगर उद्यान, सातपूर विभागात काळे नगर जॉगिंग ट्रॅक, राज्य कर्मचारी वसाहत उद्यान, नाशिकरोड विभागात जेतवन नगर उद्यान, पंचवटी विभागात भावबंधन मंगल कार्यालय येथील उद्यान येथेही बेलाची रोपे वाटप करण्यात आली.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!