नाशिक कृउबा समितीत भाजीपाला आवक कायम; मुबंईला ६२ आणि गुजरातला २७ वाहने रवाना

नाशिक कृउबा समितीत भाजीपाला आवक कायम; मुबंईला ६२ आणि गुजरातला २७ वाहने रवाना

नाशिक : करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडॉऊनमुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतून मुंबईकडे जाणार्‍या भाजीपाल्यावर झालेला परिणाम दूर झाला आहे. गेल्या आठवड्यापासुन नाशिक मार्केट कमेटीत भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने मुंबईकडे जाणारा भाजीपाला पुर्ववत झाला आहे.

गेल्या (दि.११) मे रोजी नाशिक मार्केट कमेटीत १९ हजार २०७ क्विंटल इतका विक्रमी भाजीपाला, फळे व कांदा – बटाट्याची आवक झाली होती. ही स्थिती कायम असुन शुक्रवारी (दि.१५) रोजी मुंबई उपनगरांकडे ६२ व गुजरातकडे २६ भाजीपाल्याची वाहने रवाना झाली. दरम्यान गवार, भेंडी, दोडका, कारले व हिरवी मिरचीला शुक्रवारी चांगला भाव मिळाला.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतून लॉकडाऊनच्या अगोदर मुंबई व उपनगरांसाठी दररोज ६० ते १०० वाहनातून मुंबई, उपनगरे, ठाणे, उल्हासनगर, कल्याण, भिवंडी यासह उपनगरात भाजीपाला जात होता. याच उपनगरातून जवळील अनेक ठिकाणी लहान लहान मार्केटमधील व्यापार्‍यांकडे नाशिकचा भाजीपाला पोहचतो. लॉकडाऊनच्या काळात काहीसा विस्कळीत झालेला नाशिक ते मुंबई असा भाजीपाल्याच्या पुरवठा सुरळीत आता झाला आहे.

लॉकडाऊन झाल्यानंतर मुंबईसह भाजीमार्केट मध्ये भाजीपाला पोहचण्यास निर्माण झालेले अडथळे दूर झाले आहे. यामुळे आता भाजीपाला, फळे, कांदा, बटाटा व लसुन घेण्यासाठी अनेक व्यापारी नाशिक मार्केट कमेटीत येऊ लागल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात लिलावात सहभागी होत आहे.

अशाप्रकारे गेल्या दोन आठवड्यात हळूहळू भाजीपाल्याची आवक वाढत जाऊन शुक्रवारी (दि.१५) नाशिक मार्केट कमेटीतून १६ हजार ३६० क्विंटल शेत माल नाशिक मार्केट कमेटी व नाशिकरोड उपबाजारात आला होता.

गेल्या दोन तीन आठवड्यात चांगली आवक कायम राहिली आहे. यामुळे मुंबईकडे जाणार्‍या भाजीपाल्याच्या वाहनात वाढ झाली असुन मुबईकडे ६२ आणि गुजरात राज्यात २६ वाहने भाजीपाला व कांदा रवाना झाला.

शनिवारी (दि.२५) नाशिक मार्केट कमेटीतून मुंबई व उपनगरासाठी २७, ठाणे शहर १३, कल्याण १९, बदलापूर २ व डहाणु पालघर ११, गुजरात २६ आणि पुणे २ अशी भाजीपाल्याची वाहने रवाना झाली.

शुक्रवारी (दि.१५) रोजी झालेल्या लिलाव प्रक्रियेत गवारीला सर्वाधिक असा ५ हजार रुपये भाव मिळाला. त्यांनंतर वांग्याला सरासरी सर्वाधिक असा प्रति किवंटल २२०० रु. (एकुण आवक ६७० क्विंटल) व हिरवी मिरची ३५०० रु. (आवक १९२ क्विंटल) असा भाव मिळाला. कारले ३९१५ रु(एकुण आवक ७४४ क्विंटल), गिलके ८३५ रु.(एकुण आवक २०५ क्विंटल), ढोबळी मिरची २१२५ रु.(एकुण आवक ६०८ क्विंटल), टमाटे ३५० रु.एकुण आवक ६१२ क्विंटल),

फ्लॉवर ६४० रु.(एकुण आवक ७१५ क्विंटल), कोबी २९० रु.(एकुण आवक ६८० क्विंटल), भोपळा ५३५ रु.(एकुण आवक ७३५ क्विंटल), काकडी ७५० रु.(एकुण आवक १६२२ क्विंटल),भेंडी ३००० रु. (आवक ९० क्विंंटल) असा भाव मिळाला. तसेच कांद्याला आज प्रति क्विंंटल ५५० रु., बटाटा १८०० रु. आणि लसुन ७०० रु. असा भाव मिळाला.फ

नाशिक कमेटीत भाजीपाला फळे व कांदा (क्विंटल)
* दि. 15 मे 2020 – 16 हजार 360 क्विंटल
* दि. 13 मे 2020 – 15 हजार 023 क्विंटल
* दि. 12 मे 2020 – 15 हजार 252 क्विंटल
* दि. 11 मे 2020 – 19 हजार 207 क्विंटल
* दि. 10 मे 2020 – 10 हजार 735 क्विंटल

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com