Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

लॉकडाऊनच्या काळात आदिवासींना वरदान ठरतोय मोह वृक्ष

Share

हतगड : सध्या देशासह राज्यभरात कोरोनाचे सावट पसरले आहे. यामुळे संपूर्ण देशभरात गेल्या काही दिवसापासून लॉकडाऊन आहे.त्या अनुषंगाने जिल्ह्यातील आदिवासी बांधव मोह वेचून गुजराण करतांना दिसत आहे.

दरम्यान सर्वत्र लॉकडाऊन असल्याने कामधंदे बंद असल्याने त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ येथील आदिवासी बांधवावर उपासमारीची वेळ आलेली आहे. यासाठी अनेक हातांनी त्यांना मदतही देऊ केली आहे. परंतु लॉक डाऊन मध्ये वाढ झाल्याने बिकट परिस्थिती उदभवली आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील आदिवासी बांधव सकाळच्या सुमारास मोह वेचण्याचे काम करीत आहे. आदिवासींचा कल्पवृक्ष म्हणून ओळख असलेल्या मोहाच्या फुला-फळांपासून भाकरीची सोय होईल इतपत पैसे मिळत असल्याने हे झाड आदिवासींसाठी वरदान ठरते आहे. सध्या उन्हाळा सुरू झाला असून वनौषधी वृक्षांना बहर आला आहे.

यापैकीच एक म्हणजे मोहाची फुलेहोय. दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळ्यात या फुलांना बहर आला आहे. पहाटेच्या सुमारास आदिवासी बांधव फुले वेचून ते वाळवितात. या मोहांच्या फुलांत साखर आणि अल्कोहोलचे प्रमाण चांगले असते. त्यापासून आदिवासी मद्य देखील बनवले जाते. तसेच व्हिनेगर बनवण्यासाठी मोहाच्या फुलांचा उपयोग होतो. विविध उपयोगांसाठी मोहाच्या फुलांना मागणी असते.

कोरोनाच्या संक्रमन काळात रोजगार मिळत नसल्याने आदिवासी बांधवावर उपास मारीची वेळ आलेली आहे. अशा परिस्थितीवर मात करत डोंगर दऱ्यात बांधव मोह वाचण्याच्या कामातून आपली गुजराण करीत आहेत.

– अशोक भोये, सुरगाणा

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!