Friday, April 26, 2024
Homeनाशिकजुने नाशिक परिसरात मशिदींच्या भोंग्यातून जनजागृती

जुने नाशिक परिसरात मशिदींच्या भोंग्यातून जनजागृती

जुने नाशिक : दिवसेंदिवस कोरोनाव्हायरस चा धोकावाढत आहे अशा पार्श्वभूमीवर देश तिसऱ्या टप्प्यात प्रवेश करीत असताना संपूर्ण लॉक डाऊन ची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी सर्वजण प्रयत्न करीत आहे, प्रशासन यंत्रणादेखील संपूर्ण ताकदीनिशी या कामात व्यस्त आहे. तरीही जुने नाशिक भागातील काही ठिकाणी याची अंमलबजावणी काटेकोरपणे होताना दिसत नसल्याने बुद्धिजीवी, उलमा व मौलाना मंडळींनी पुढाकार घेऊन याबाबत प्रबोधन करीत आहे.

दरम्यान येथील मशिदीतील भोंगाद्वारे परिसरातील लोकांना आवाहन करण्यात येत आहे की आपण घरातच थांबा स्वतःला सुरक्षित करा व इतरांनाही सुरक्षित ठेवावा विनाकारण कोणी बाहेर येऊ नये वाहने काढू नये, तरुण मंडळींनी घराचे काम करावे, वृद्ध ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना घराबाहेर काढू नये, कोणत्याही प्रकारचे खेळ रस्त्यावर खेळू नये अशा प्रकारच्या सूचना सतत देण्यात येत आहे.

- Advertisement -

शहर परिसरातील जवळपास सर्व मशिदींना बाहेरून लॉक करण्यात आले आहे.  दिवसातील पाच वेळा नमाज देखील ठराविक चार लोक अदा करीत आहे, बाकीच्यांना घरीच नमाज पठण करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्याच प्रमाणे विविध दर्गा शरीफ इतर धार्मिक स्थळे देखील जुने नाशिक मधील बंद आहे लोकांनी शासनाच्या निर्देशांचे पालन करावे असे आवाहन सतत करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे प्रशासनाच्याा वतीने जुने नाशिक भागातील महत्त्वाच्या चौकांमध्ये ध्वनिक्षेपक द्वारे लोकांना आवाहन करण्यात येत आहे.

ध्वनिक्षेपकावरून लोकांना आवाहन करण्यासाठी धर्मगुरूंची मदत देखील घेण्यात येत आहे. समाजातील मान्यवर जसे शिक्षक डॉक्टर आदींची मदत देखील घेण्यात येत आहे. माइक द्वारे हे लोक लॉक डाऊनची अंमलबजावणी करण्याचे आवाहन करीत आहे. तसेच दुचाकीवर मोबाईल माईक लावून विविध ठिकाणी जनजागृती करण्याचे काम होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या