Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

विदेशी पर्यटकां अभावी अनेक हॉटेल्सना टाळे; महिनाभरात सुमारे तीस कोटीच्या व्यवसायाचे नुकसान

Share

सातपूर : आंतरराष्ट्रीय स्तरावरून करोना या आजाराने थैमान घातल्याने संपूर्ण जग ग्लोबल लॉकडाऊन झाले आहे. मात्र यामुळे नाशिक शहर परिसरातील हॉटेल व्यवसाय गंभीर अडचणीत सापडला आहे.

शहराला पर्यटनाचा एक वेगळा वरचा आहे धार्मिक स्थळ उद्योग नगरी वाईन कॅपिटल भाजीपाला केंद्र अशा विविध महत्वपूर्ण घडामोडींमुळे शहरात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे पर्याय नाही हॉटेल इंडस्ट्री वेगाने वाढू लागली आहे.

नाशिक मधील औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बहुराष्ट्रीय उद्योगांचा सहभाग आहे त्यामुळे या उद्योगातील परदेशातील वरिष्ठ अधिकारी सातत्याने नाशिकला भेट देत असतात. त्यांच्या राहण्याची व खाण्याच्या सवयीमुळे ते निर्धारित हॉटेल्समध्ये थांबत असतात वरिष्ठ पदाधिकारी तसेच परदेशी पाहुण्यांना सेवा देण्यासाठी नाशिक परिसरात सुमारे १८ ते २० राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय हॉटेल्स कार्यरत आहेत.

करोनाच्या संसर्गामुळे देशांतर्गत प्रवास थांबलेला आहे. आपल्या परिसरातील नागरिकांद्वारे परस्परांना भेटणे ही टाळले जात असताना परदेशी पाहुण्यांचे स्वागत कोण करील हा प्रश्न निर्माण झाला आहे विमानसेवा रेल्वे वाहने सर्व बंद असल्याने हॉटेल व्यवसायिकांनी आपल्या व्यवसायांना टाळे ठोकावे लागले आहे.

परदेशी पाहुण्यांच्या वर्दळीला आळा बसल्याने नाशिक परिसरातील हॉटेल व्यवसायिकांचा एका महिन्याचा सुमारे पंचवीस ते तीस कोटी रुपयांचा व्यवसायाचा फटका बसला आहे यासोबतच हॉटेल बंद असल्यामुळे सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतन देणे, हॉटेल देखभाल दुरुस्तीसाठी खर्च करणे, विज बिल, पाणी बिल व इतर खर्च यांची गोळा बेरीज केल्यास पंधरा ते वीस कोटी रुपयांचा भुर्दंड सोसावा लागत आहे.

यासोबतच या व्यवसायावर अवलंबून असलेले कॉन्ट्रॅक्टर पुरवठादार यांच्याही व्यवसायात मोठा फटका बसणार आहे
संचारबंदी शिथिल झाली तरी या व्यवसायाला स्थिरस्थावर होण्यासाठी वर्षभराचा कालावधी निघून जाण्याची शक्यता आहे कारण देशांतर्गत पर्यटन सुरू होऊन आंतरराष्ट्रीय स्तरावरून पर्यटकांची वर्दळ सुरू होण्याचा खूप कालावधी लागण्याची शक्यता आहे त्यामुळे होटेल व्यवसायीकांना करोना प्रादुर्भावानंतरचे वर्ष गंभीर समस्येला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र आहे.

अनेक छोट्या-मोठ्या व्यवसायिकांनी बँकांचे कर्ज घेतलेले आहे हॉटेलच्या मेंटेनन्स साठी लागणारा खर्च व बँकांचे व्याज हे कोणतेही उत्पन्न असताना भरावे लागणार आहे यामुळे निश्चितच हॉटेल व्यवसाय डबघाईला येण्याची शक्यता आहे अनेक हॉटेल व्यावसायिकांनी चर्चा केली असता शासनाकडून आर्थिक मदत नव्हे तर बँकांच्या व्याजात सूट जरी मिळाली तरी या व्यवसायाला नवसंजीवनी मिळेल असे मतप्रवाह ही समोर आले आहेत.

अडचणीतही जपली सामाजिक बांधिलकी

व्यवसाय अडचणीत असला तरी त्याहूनही मोठी अडचण समाजातील वंचित घटकांची आहे. हि जाणीव ठेवत बहुतेक हॉटेल व्यवसाय करणे आपल्या किचनमध्ये अन्न शिजवून परिसरातील गरजवंत लोकांना अन्नदान केले काही ठिकाणी पाणी वाटप करण्यात आले काही ठिकाणी अल्पोपहार दिला गेला.

पर्यटनाला प्रोत्साहन देताना शहरात मोठ्या प्रमाणात हॉटेल उद्योग विकसित होत आहेत. संचारबंदी नंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे या उद्योगांची परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. अनेक छोटे-मोठे व्यवसायिक कर्जाच्या बोझ्यामुळे अडचणीत आले आहे.

आणखी असेच चालले तर काही हॉटेल चालकांना व्यवसाय बंद करण्याची पाळी येईल शासनाने हॉटेल इंडस्ट्रीला या लाँकडाऊन काळातील कर्जावर व्याज माफ करावे जेणेकरून ह्या व्यवसायाला ऊर्जितावस्था मिळेल
-विकास शेलार (संचालक हाँटेल एक्प्रेस इन)

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!