सायखेडा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी पांगवताना पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर हल्ला

सायखेडा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी पांगवताना पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर हल्ला

सायखेडा : कोरोना रोगाचा वाढत्या पार्श्वभूमीवर गर्दी करू नका एकत्र येऊ नका असे आवाहन नागरिकांना सायखेडा पोलीस करत असतानाच पोलिसांवरच दोन नागरिकांनी हल्ला केल्याने यांच्याविरोधात सायखेडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमोल बाबुराव कुटे आणि संतोष बाबुराव कुटे संशयितांची नावे आहेत.

सायखेडा पोलिसांमार्फत सायखेडा आणि परिसरामध्ये करून रोगाचा पार्श्वभूमीवर नागरिकांनी एकत्र जमून हे गर्दीत येण्याचे टाळावे असे आवाहन करण्यात येत होते. यासंदर्भात सायखेडा येथील त्रिमूर्ती चौक येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ, हवालदार सोनवणे, पोलीस हवालदार मदन कहांडळ गेले असता तेथे काही तरुणांचा जमाव त्यांना दिसला आणि या ठिकाणी गर्दी करु नका असे आवाहन त्यांनी उपस्थिती तरुणांना केले.

मात्र काही युवकांनी यांनी तुम्ही आम्हाला का पांगवता, तुम्ही आमचे काम बंद का पडले आहे असे म्हणत शिवीगाळ केली. हातातील काठी हिसकावून अमोल कुटे यांनी पाठीमागून पकडून धरत संतोष कुटे यांनी हातातील काठीने पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ, हवालदार सोनवणे, कहांडळ यांच्यावर वार करत हात पाय आणि पाठीवर दुखापत केली.

यावेळी पोलीस हवालदार पी नवले, भाबड उपस्थित होते. त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनाही शिवीगाळ केली. सदर आरोपींनी सरकारी कामात अडथळा निर्माण केला आणि सरकारी कर्मचाऱ्यांवर सेवा बजावत असताना हल्ला केला या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे

जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी गर्दी हटवत असताना सदर आरोपीनी सरकारी कामात अडथळा निर्माण करून माझ्यासह कर्मचाऱ्यांवर हल्ला केला, शिवीगाळ केली, सरकारी गणवेश फाडला, त्यांना पुढील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे
-आशिष अडसूळ, सहाय्य्क पोलीस निरीक्षक सायखेडा

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com