मनसेचे अशोक मुर्तडक यांची हंगामी सभापती म्हणुन निवड

नाशिक । नवीन आठ स्थायी सदस्य नियुक्ती व सभापती निवड ही न्यायालयीन प्रक्रिया व शासनाच्या आदेशाने लांबली गेली आहे. यामुढे पुढच्या काळात स्थायीचे कामकाज व शहराची विकास कामे थांबली जाऊ नये ही बाब लक्षात घेत आणि स्थायी सभापती पदाची मुदत उद्या (दि.29) संपणार असल्याने आज (दि.28) स्थायी समिती सभेत सभापती उद्धव निमसे यांनी हंगामी सभापती म्हणुन माजी महापौर अशोक मुर्तडक यांची निवड केली.

सभापतींच्या या निर्णयामुळे आश्चर्य व्यक्त केले जात असतांनाच हा निर्णय आपण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलून घेतल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले. दरम्यान शासनाच्या आदेशानुसार आजच्या स्थायीच्या सभेत 157 कोटींचे भुसंपादनाचे प्रस्ताव न ठेवल्याबद्दल प्रशासनाला धारेवर धरण्यात आले.

महापालिका स्थायी समिती सभापती व निवृत्त होत असलेल्या सात सदस्यांची मुदत उद्या (दि.29) संपुष्टात येत आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या स्थायी समिती सभेत १५७ कोटींच्या २७ भुसंपादनाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी स्थायीने केलेली तयारी बिनकामाची ठरली.

स्थायी सभापतींची मुदत 29 फेब्रुवारी रोजी संपत असल्याने, शहर विकासाची कामे थांबता कामा नये तसेच न्यायालयाचा निर्णय येईपर्यत हंगामी सभापती निवडण्याची गरज असल्याचे मत सभापतींनी मांडले. यानुसारच पुढच्या काळासाठी हंगामी सभापती म्हणुन आपण अशोक मुर्तडक यांनी निवड करीत असल्याचे सभापती निमसे यांनी जाहीर केले. यानंतर स्थायी सभा संपविण्यात आली.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *