Thursday, April 25, 2024
Homeनाशिकखंबाळे : आशा सेविकेच्या पतीस पोलिसांकडून मारहाण

खंबाळे : आशा सेविकेच्या पतीस पोलिसांकडून मारहाण

नाशिक : सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हय़ातील प्रत्येक घरात जाऊन आशा सेविकांमार्फत सर्व्हेक्षण केले जात आहे. दरम्यान एक आशा सर्व्हे साठी जात असताना वाटेत बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांनी आशा सेविकेच्या पतीस मारहाण केल्याची घटना घडली आहे.

दरम्यान खंबाळे अर्चना बाळू पढेर असे आशा सेविकेचे नाव आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवक, सेविका, अंगणवाडी सेविका तसेच आशा वर्कर्स यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रत्येक घरी सर्वेक्षण करण्यात येत आहे.

- Advertisement -

यासाठी खंबाळे उपकेंद्र ता. इगतपुरी अंतर्गत डहाळेवाडी येथील आशा श्रीमती अर्चना बाळु पढेर हे डहाळेवाडी येथे जात होत्या. त्यांच्या गावापासून हे अंतर दोन ते तीन किलोमीटर असल्याने त्यांनी पतीसोबत उपकेंद्रावर जाण्यास निघाल्या. यावेळी चौफुलीवर असलेल्या पोलिसांनी विचारपूस न करता त्यांच्या पतीस मारहाण केली.

घटनेची माहिती मिळाल्यावर जिल्हा आरोग्य अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोडे, पोलीस अधीक्षक आरती सिंग यांच्याशी चर्चा झाली. यानंतर घटनेची दखल घेऊन प्रशासनाने ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना जिल्हा परिषदने यावर तात्काळ निर्णय घेण्याची मागणी होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या