Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नाशिकरोड : बनावट डोमासाइल सर्टिफिकेटद्वारे लष्करात भरती; दोघांवर गुन्हा

Share
नाशिकरोड : बनावट डोमासाइल सर्टिफिकेटद्वारे लष्करात भरती; दोघांवर गुन्हा Latest News Nashik Army Recruitment Based on Fake Domicile Certificates

नाशिक : बनावट डोमिसाईल प्रमाणपत्र सादर करून लष्करात भरती झाल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वीच प्रकार घडला होता. याच प्रकाराची पुनरावृत्ती पुन्हा झाली असून या प्रकरणी उपनगर पोलीसांत संबंधिताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नायक सुभेदार रवींद्रकुमार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १ एप्रिल २०१९ रोजी अनुरागसिंह कुशवाह हा आर्टिलरी सेंटरमध्ये सोल्जरचे प्रशिक्षण घेत होता. १४ एप्रिल २०१९ रोजी दिनेशकुमार यादव सोल्जर म्हणून भरती झाला. नोव्हेंबर २०१८ मध्ये अरूणाचल प्रदेशातील रिक्रुटमेंट कार्यालयात घेण्यात आलेल्या आर्मी भरतीत उत्तीर्ण झालेल्या व सदर पदासाठी आवश्यक असणार्‍या शैक्षणिक व इतर कागदपत्रांची पूर्तता करणार्‍या उमेदवारांची निवड करण्यात आली होती.

उत्तीर्ण झालेले उमेदवार प्रशिक्षणासाठी नाशिकरोड येथे दाखल झाले. कुशवाह व यादव यांची मूळ कागदपत्र पडताळणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवले असता ते पडताळणी करून दि. २२ ऑक्टोबर २०१९ रोजी आर्मी कार्यालयाला सादर केलेले प्रमाणपत्र बनावट असल्याचे निदर्शनास आले.

त्यामुळे त्यांनी सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी वरील दोघांविरूद्ध उपनगर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास वपोनि सुनील रोहोकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि लोंढे हे करीत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!