Friday, April 26, 2024
Homeनाशिक५५ वर्षावरील पोलीसांना गर्दीपासून दुर नियुक्ती; पोलीस आयुक्तांचा निर्णय

५५ वर्षावरील पोलीसांना गर्दीपासून दुर नियुक्ती; पोलीस आयुक्तांचा निर्णय

नाशिक : ५५ पेक्षा अधिक वय असणर्‍या पोलीस सेवकांना करोना संसर्ग झाल्याचे समोर आल्यानंतर निवृत्ती समीप असलेल्या पोलिस सेवकांना कर्तव्यापासून दूर ठेवण्याचा निर्णय मुंबई पोलिसांनी घेतला आहे. त्या पाठोपाठ नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी ५५ वर्षावरील सुमारे १२५ सेवकांना गर्दीचा संपर्क होणार नाही, अशा ठिकाणी नियुक्ती देण्याचा निर्णय घेतला आहे.

पोलिस आयुक्तालयात पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली आज सांयकाळी बैठक आयोजीत करण्यात आली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

- Advertisement -

करोनामुळे मुंबईतील पोलिस कर्मचाऱ्यांना आपल्या प्राणास मुकावे लागले. यामुळे मुंबई आयुक्तांनी ५५ वर्षावरील सेवकांना आराम देण्याचा निर्णय घेतला आहे. तर जिल्ह्यात मालेगावमध्ये ३ पोलिसांना करोनाची लागण झाली असून, या सर्वांचे वय किमान ५० वर्षापुढील आहे. नाशिकमध्ये निवृत्तीसमीप पोहचलेल्या सेवकांची संख्या मोठी अाहे.

शहर पोलिस दलात साडेतीन हजार पोलिस अधिकारी व कर्मचारी तैनात आहेत. त्यात १२५ पोलीस सेवक हे ५५ वर्षांच्या पुढील आहे. नाशिकमध्ये मुंबईप्रमाणे स्थिती नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना गर्दीची ठिकाणे टाळून नियुक्ती देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

याबरोबर नियंत्रण कक्षाद्वारे दररोज विभाग प्रमुखांना कॉल करून त्यांच्या अधिपत्याखालील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची माहिती संकलीत करण्यात येणार आहे. यामुळे संबंधीत कर्मचारी माहिती लागलीच वरिष्ठांना उपलब्ध होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या