Friday, April 26, 2024
Homeनाशिकएचपीटी महाविद्यालयात साकारला प्राचीन भारत

एचपीटी महाविद्यालयात साकारला प्राचीन भारत

नाशिक : हंप्राठा कला आणि रायक्ष विज्ञान महाविद्यालयातील इतिहास विभागाच्या विद्यार्थ्यांनी भित्तीपत्रकांद्वारे प्राचीन भारताच्या इतिहासाला उजाळा दिला.

विद्यार्थ्यांनी थोडक्यात परंतु मुद्देसूदपणे प्राचीन भारतात इतर विभागांचे विद्यार्थी आणि प्राध्यापकांना डोकावण्याची संधी उपलब्ध करुन दिली. यामध्ये वैदिक काळातील जीवन पद्धती, जैन, बुध्द, आजीवक, अशोककालीन जीवन, सिंधू संस्कृती आणि तत्वे यांची सचित्र माहिती सादर करण्यात आली.

- Advertisement -

त्याचप्रमाणे प्राचीन मंदिरे आणि शस्त्रास्त्रे आणि हत्यारांच्या माहितीचे सादरीकरण करण्यात आले. प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. इतिहास विभाग प्रमुख डॉ. अतुल ओहाळ, डॉ. मालती सानप, डॉ. रामदास भोंग, प्रा. प्रदीप पवार, प्रा. डगळे मॅडम आदींच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी भित्तीपत्रके तयार केली.

शस्त्रास्त्र प्रदर्शन व लिटफेस्ट
महाविद्यालयात विविध विभागांचे उपक्रम सुरु आहेत. इतिहास विभागातर्फे शनिवारी (२९ फेब्रुवारी) शस्त्रास्त्र प्रदर्शन भरविले जाणार आहे. याच दिवशी इंग्रजी विभागातर्फे लिटफेस्ट अर्थात, साहित्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या