Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

सुरगाणा : रगतविहिर येथे विजेचा पोल कोसळला; महिला थोडक्यात बचावली

Share
सुरगाणा : रगतविहिर येथे विजेचा पोल कोसळला; महिला थोडक्यात बचावली Latest News Nashik An electric pole collapsed at Ragatvihir

हतगड : सुरगाणा तालुक्यातील रगतविहिर येथे सकाळच्या सुमारास विजेचा पोल अचानक कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत एक महिला थोडक्यात बचावली.

दरम्यान रगतविहिर या गावातील भोयेपाड्यावर राहणाऱ्या जीवु भोये यांच्या घराशेजारी हा विजेचा पोल कोसळला. या घरातील महिला घराची साफसफाई करत असताना अचानक विजेचा पोल त्यांच्यासमोर येऊन कोसळला. यात मयनाबाई नामक महिला अगदी थोडक्यात बचावली.

रगतविहिर हे गाव गुजरात सीमेवर असून तालुक्यापासून ४० किलोमीटर अंतर असल्यामुळे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. येथील लोकांना निव्वळ मोबाइल चार्ज करण्यासाठी गुजरात मध्ये जावे लागते अशी परिस्थिती असते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!