Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

त्र्यंबकेश्वर : अंबोली आरोग्य केंद्राची आरोग्य सेवा वाऱ्यावर; भेटीप्रसंगी आमदार खोसकर  संतप्त 

Share

वेळूंजे वि. प्र. : तालुक्यातील अंबोली आरोग्य केंद्रात सुविधांची वाणवा असल्याने तसेच केंद्राचा ढिसाळ निदर्शनास आल्याने आमदार हिरामण खोसकर यांनी येथील अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले.

इगतपुरी- त्र्यंबकेश्वर तालुक्याचे आमदार हिरामण खोसकर यांच्या आरोग्य केंद्र भेटीप्रसंगी अंबोली आरोग्य केंद्रातील आरोग्य सुविधांबाबत पाहणी केली.

यावेळी नागरिकांनी येथील कर्मचाऱ्यांच्या तक्रारीचा पाढा आमदार खोसकर यांच्यासमोर मांडला. परिसरातील तीस ते चाळीस गावे या आरोग्य केंद्रावर अवलंबून असताना आरोग्य केंद्रात स्वछतेचा अभाव दिसून आला. आमदार खोसकर यांनी गावकऱ्यांसह आरोग्य केंद्राच्या कामकाजा बाबत वैद्यकीय अधिकारी  व कर्मचारी यांना जाब विचारत फैलावर घेतले. तसेच पुरेसा औषध साठा नसल्याने नागरिकांना त्र्यंबक गाठावे लागते.

यावेळी आरोग्य केंद्रात फिरून आरोग्य केंद्राचा आढावा घेतला. आरोग्य व्यवस्थेवर प्रशासनाचा अंकुश नसल्याने असुविधा पहावयास मिळाल्याचे आमदार खोसकर यांनी सांगितले. आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचारी उपचार करण्या ऐवजी पोलीस तक्रार करण्याच्या दम देत असल्याची तक्रार येथील तरूणांनी केली.

यावेळी राष्ट्रवादी कार्याध्यक्ष अरूण मेढे, शिवसेना उपतालुका प्रमुख संजय मेढे, अँड.भास्कर मेढे, ग्रा.प सदस्य तानाजी कड, जयराम मोंढे, हरिभाऊ बोडके,  पो.पा. ज्ञानेश्वर मेढे आदी असंख्य  नागरिक उपस्थित होते.

आरोग्य केंद्राचा स्वच्छ राखणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील नागरिक आपल्यावर विसंबून असताना डॉक्टरांची वाणवा दिसून येते. यापुढे नागरिकांच्या तक्रारी आढळल्यास कारवाई करण्यात येईल. तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी कामकाजात सुधारणा करावी.
– आमदार हिरामण खोसकर

येथील डॉॅक्टर व कर्मचारी रुग्णांना योग्य वागणूक देत उपचार करणे आवश्यक आहे. तसेच कर्मचाऱ्यांनी आपले घर समजून आरोग्य केंद्राच्या स्वच्छतेविषयी काळजी घेतली पाहिजे.
– अरुण मेढे, राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्याध्यक्ष

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!