Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

वाहतुक कोंडी : निमाणी चौकात अडथळेच अडथळे; रिक्षा,एसटी बसमुळे कायम चौक जाम

Share
वाहतुक कोंडी : निमाणी चौकात अडथळेच अडथळे; रिक्षा,एसटी बसमुळे कायम चौक जाम Latest News Nashik Always a traffic Jam at Nimani Signal

नाशिक । पंचवटीतील मुख्य चौकांपैकी प्रमुख असलेल्या निमाणी चौकाला रिक्षा, बस तसेच अनाधिकृत भाजीपाला विक्रेत्यांच्या आडथळ्यांचे कायम ग्रहण लागलेले आहे.

शहर एसटी बस डेपोचे मुख्य बसस्थानक या चौकात आहे. सर्व शहरभर सुटणार्‍या बस या बसस्थानकातून सुटतात. या बसस्थानकात जाण्यााठी तसेच बाहेर पडण्यासाठी एकच प्रवेशद्वार आहे. यामुळे बसस्थानकातून बस बाहेर पडत असताना या चौकातून आडगाव नाक्याकडे तसेच नाक्याकडून पंचवटी कारंजाकडे येणारी सर्व वाहने आडकून पडतात. यामध्ये या ठिकाणी रस्ता अरूंद आहे. त्यावरच व्यावसायिकांचे अतिक्रमण, रिक्षांचे टोळके यामुळे बस लवकर बाहेर पडत नाही.

यामुळे दोन्ही बाजुचा रस्ता बंद होऊन प्रेत्येक बसवेळी येथे वाहतुक कोंडी होत असते. चौकाच्या पश्चिमबाजुला शरदचंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. या ठिकाणी जिल्हाभरातून शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी ये असतात. तर किरोळ व्यापारी खरेदीसाठी येत असतात. यामुळे या भागात कायम ट्रक तसेच मालवाहतुक करणार्‍या वाहनांची वर्दळ असते. येथून माल विकत घेऊन निमाणी चौक ते महालक्ष्मी थेटर दरम्यान अनाधिकृतपणे भाजीपाला विक्रेते रोडवरच बसत असल्याने वाहनांना आडथळा होतो. तसेच इतर व्यावसायिकांची मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे आहेत.

या चौकात आडगाव नाका, पंचवटी कारंजाकडे जाणारा रोड, दिंडोरी रोड, बसस्थानकाच्या दोन्ही बाजु रिक्षा स्टॅण्डने व्यापले आहेत. रिक्षा स्टॅण्डची क्षमता 8 ते 10 रिक्षा असताना या ठिकाणी 15 ते 20 रिक्षा उभ्या असतात. अनेकदा रिक्षा रस्त्याच्या मधोमध उभ्या असतात. परंतु रिक्षा चालकांच्या दादागिरी, अरेरावीपुढे कोणी बोलत नाहीत. तर वाहतुक पोलीस असून नसल्यासारखे याकडे दुर्लक्ष करतात. बहूतांश वेळा या ठिकाणी वाहतुक पोलीस दिसतच नाहीत.

जगप्रसिद्ध काळाराम मंदिर व गंगाघाटावर जाण्यासाठी भाविक निमाणी बसस्थानकात येत असल्याने या चौकात कायम भाविकांची गर्दी असते. भाविकांना तसेच प्रवाशांना घेण्यासाठी रिक्षांची चढाओढ सुरू असते. यामुळे या चौकातून मुंबई – अग्रा महार्गाला जोडणार्‍या आडगाव नाका, दिंडोरी रोड, बाजार समिती, गंगा घाट, पंचवटी कारंजा याकडे जाणार्‍या सर्व बाजुच्या वाहनांना अडथळा निर्माण होऊन दर काही मिनीटानी हा चौक वाहतुक कोडींने अडकून पडल्याचे चित्र असते. याच्या परिणामी सर्व वाहनचालक प्रत्येकाला घाई असल्याप्रमाणे आडवे तिडवे वाहन घुसवत असतात. यामुळे या चौकात प्रामुख्याने सकाळी व सायंकाळी कायम वाहतूक कोंडी सदृश स्थिती पाहवयास मिळते.

विद्यार्थ्यांच्या अपघातांचा विसर
निमाणी चौकाच्या बाजुलाच आरपी विद्यालय आहे. तर पुढील सेवाकुंज परिसरात श्रीराम विद्यालय आहे. सकाळी विद्यालय भरताना तसेच सुटताना मुलांची गर्दी तसेच त्यांना सोडवण्यासाठी तसेच घेण्यासाठी आलेल्या स्कुल व्हॅन तसेच पालकांच्या गाड्या यांची मोठ्या प्रमाणात गर्दी यावेळी होत असते. यापुर्वी बस तसेच इतर वाहनांच्या धडकेत विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना या चौक परिसरात घडल्या आहेत. मात्र याचा पोलीस तसेच प्रशासनाला विसर पडला आहे.

अतिक्रमणे हटवा
निमाणी चौक तसाआकाराने मोठा आहे. पंचवटी कारंजाकडील बाजुस कधीच अडचण येत नाही. दिंडोरी रोड, आडगाव नाका रोडवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. अशातच व्यावसायिक गाळ्यांना पार्किंग नसल्याने येथे सर्व वाहने रस्त्यावरच पार्क केली जातात. याच्या परिणामी वाहतुक कोंडी होते.
– सुधाकर कापसे, व्यावसायिक
———
रिक्षा चालकांची अरेरावी
निमाणी चौकाच्या प्रत्येक कोपर्‍यावर रिक्षांची गर्दी आहे. प्रामुख्याने बस स्थानकास कायम रिक्षांचा वेढा असतो. अनेकदा रिक्षा चालक रस्त्यावर रिक्षा पार्क करून कोंडाळे करून धिंगाणा घालत असतात. प्रवाशी महिलांशी अरेरावी, बाहेरील भाविकांची लूट केली जाते. तसेच बस व इतर वाहनांना अडथळा केला जातो त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.
– अरविंद पगारे, नागरीक

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!