Friday, April 26, 2024
Homeनाशिककोरोना वॉरियर्ससाठी रियुझ होणाऱ्या बारा हजार कापडी मास्कचे वाटप

कोरोना वॉरियर्ससाठी रियुझ होणाऱ्या बारा हजार कापडी मास्कचे वाटप

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिवाची परवा न करता जनतेच्या सुरक्षे साठी पोलीस प्रशासन रस्त्यावर कार्यरत आहेत. या सर्वांना कोरोना पासून सुरक्षा मिळावी, या साठी दोन सामाजिक संस्थानी मिळून बारा हजार कापडी मास्कचे वाटप करण्यात आले.

नाशिक पोलीस आयुक्त कार्यालयात मास्क वाटपाचा पहिला टप्पा आज पार पडला. यावेळी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना एकूण पाच हजार कापडी मास्क प्रदान करून पूर्ण करण्यात आले.

- Advertisement -

सध्या कोविड१९ चे सावट जगभरात दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. सुरक्षेसाठी वापरले जाणारे मास्कचा तुटवडा बाजारामध्ये बघायला मिळतो आहे. त्यातच पोलीस प्रशासन आपली जीवाची बाजी लावून काम करीत आहेत. त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणे महत्वाचे आहे. यामुळे इम्पॉरमेंट ऑफ नासिक व एन. एस. बी. एस. या सेवाभावी संस्थांनी एकत्र येऊन निधी उभारून जवळपास “बारा हजार” कापडी धुवून वापरता येतील अशा प्रकारचे मास्क तयार करण्यात आले आहे. त्या सर्वांचे योग्य प्रकारे निर्जंतुकीकरण ही करण्यात असले आहे.

याकामी सदर सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते संगीता चव्हाण, अंजली पावगी , रोहित कदम, सुरेखा कमोद, जयश्री पेंढारकर, पूनम लोखंडे, मंदाकिनी पाटील, प्रकाश बर्वे सह आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार राजेश सावंत यांचे विशेष योगदान लाभले.

तसेच नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासही याच प्रकारे मास्क प्रदानाचा दुसरा टप्पा पूर्ण करून माननीय जिल्हाधिकारी श्री सुरज मांढरे यांना ही पाच हजार मास्क प्रशासकीय कर्मचाऱ्यांसाठी प्रदान करण्यात येणार आहे. तसेच तिसऱ्या टप्प्यात नाशिक मधील अत्यावश्यक सेवेमध्ये कार्यरत असलेली सामान्य नागरिक, वैद्यकीय कर्मचारी तसेच गरजू गोरगरीब व्यक्तींना दोन हजार मास्क प्रदान करण्यात येणार आहेत,

ह्या “बारा हजार” मास्क निर्मिती साठी लागणारे कापड मोहम्मद हुसेन, पाकीजा कटपिस सेंटर यांनी सदर सामाजिक संस्थांना सदर उदात्त कार्यासाठी निम्म्या किमतीत उपलब्ध करून महत्त्व पूर्ण मदत केली हे एक सामाजिक व धार्मिक ऐक्याची द्योतक म्हणता येईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या