Friday, April 26, 2024
Homeनाशिकपंचायत समितीकडून ग्रामीण भागात कृषी मार्गदर्शन

पंचायत समितीकडून ग्रामीण भागात कृषी मार्गदर्शन

त्र्यंबकेश्वर : पंचायत समितीच्या कृषी विभागाकडून तालुक्याच्या ग्रामीण भागात जाऊन कृषी मार्गदर्शन करण्यात आले. यात प्रामुख्याने शेतकरी व शेतकरी बचत गट, महिला कृषी सखी यांची उपस्थिती यावेळी होती.

दरम्यान महाराष्ट्र जीवन ग्रामीण उन्नती अभियान (उमेद) अंतर्गत पंचायत समितीचे तालुका कृषी अधिकारी सुनील विटनोर यांनी प्रामुख्याने मार्गदर्शन केले. कोणे येथे हा कार्यक्रम झाला. अन्य खेड्यात ही लागवड पूर्व शेती विषयक कामकाज, बियाणे उगवण क्षमता तपासणी, बीजप्रक्रिया करणे, प्रात्यक्षिक, बियाणे खरेदी करतेवेळी घ्यावयाची काळजी, तांदुळ पाणी तयार करून वापर करणे, पीएसबीचा वापर करणे इ विषयक मार्गदर्शन चर्चा व प्रात्यक्षिक यातून करण्यात आले.

- Advertisement -

कृषी विस्तार अधिकारी श्रीमती वसावे यांनी जीवामृत, घन जीवामृत, दशपरणी अर्क, गांडूळ खत, निंबोळी अर्क तयार करणे व त्याचे वापर व फायदे, सेंद्रिय शेती इत्यादी बाबीवर मार्गदर्शन केले. तसेच श्रीमती भिसे, विस्तार अधिकारी कृषी यांनी चतुसूत्री भात लागवड पद्धत, अझोला तयार करणे व त्याचे फायदे, भात पिकावरील किड व रोग नियंत्रण इत्यादी बाबीवर मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमास अनेक गावांतील कृषिसखी तसेच काही उद्योग सखी व बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या त्यांना कोविड-१९ प्रतिबंधात्मक उपायोजना करून सोशल डिस्टन्स ठेवून मास्क आणि सैनी टायझर चा वापर करून कृषी विभाग पंचायत समिती यांनी कृषी सखी /पशु सखी यांना शेती विषयक विविध बाबींचे मार्गदर्शन केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या