Saturday, April 27, 2024
Homeनाशिकपुणे विद्यापीठाची प्राध्यापक पदाची जाहिरात महिनाभरात येणार

पुणे विद्यापीठाची प्राध्यापक पदाची जाहिरात महिनाभरात येणार

नाशिक । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्राध्यापक पदाच्या 111 रिक्त जागांसाठी येत्या महिन्याभरात जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. त्याचबरोबर राज्याच्या अर्थ मंत्रालयाच्या मान्यतेच्या प्रतीक्षेत 800 जागा रिक्त जागा असून, या जागांच्या भरतीसाठी अर्थमंत्र्याम्सोबत लवकरच बैठक घेऊन हा प्रश्न निकाली काढला जाण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारने विद्यापीठांना घालून दिलेल्या निकषांनुसार भरती प्रक्रिया पार पडेल. यामध्ये वित्त विभागाच्या मान्यतेच्या प्रतीक्षेत 800 जागा रिक्त आहेत. सरकारने एकूण रिक्त जागांच्या 80 टक्के जागा भरणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, सामान्य प्रशासन विभागाकडून एक निर्णय रद्द झाला. त्यामुळे भरती प्रक्रिया थांबली होती. मात्र, आता या प्रक्रियेत सुधारणा करण्यात येणार असून, प्राध्यापकांची भरती सर्व विद्यापीठांमध्ये होणार आहे. विद्यापीठांप्रमाणे महाविद्यालयातील भरतीचा प्रश्न सोडविण्याचा निर्णय घेण्यात आला असून हा निर्णय केवळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठापुरता नसून सर्व विद्यापीठांतील रिक्त जागांवर भरती होणार आहे.

- Advertisement -

राज्यातील कॉलेजांमध्ये सुमारे 55 हजार शिक्षक आहेत. या शिक्षकांना अद्ययावत प्रशिक्षण देण्यासाठी पुण्यात स्वतंत्र अकादमीची स्थापना करण्यात येणार आहे. ‘रोटेशन’ पद्धतीने शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येईल. येत्या महिन्याभरात मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडला जाईल. येत्या एक मार्चपासून प्रशिक्षण वर्ग सुरू होतील.

- Advertisment -

ताज्या बातम्या